Jalna News : कुंभारझरी येथे चारचाकी वाहनाच्या धडकेत तीन युवकांचा मृत्यु

अपघातातील मृत युवक
अपघातातील मृत युवक

जाफराबाद, पुढारी वृत्तसेवा : कुंभारझरी काळेगाव फाट्यालगत असलेल्या टी पॉईंटवर चारचाकी आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन तीन जण जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी (दि.11) दोनच्या सुमारास घडली. याप्रकरणी अमोल साळवे यांच्या फिर्यादीवरून टेंभुर्णी पोलीस ठाण्यात चारचाकी गाडी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Jalna News)

याबाबत अधिक माहिती अशी, कुंभारझरी रोडवर काळेगाव फाट्यानजीक कुंभारझरी रोडने येत असलेल्या चारचाकी (क्रमांक एमएच. 21 डी 4603) चालक नंदकिशोर प्रकाश चव्हाण (रा. कुंभारझरी) यांनी भरधाव वेगात निष्काळजीपणाने वाहन चालवत मोटरसायकलीला धडक दिली. यामध्ये मोटरसायकलवर असलेले विजय संतोष बोर्डे (वय.24) सुभाष रोहन वानखेडे (वय.24 रा.हिवरा काबली) तर सुरज गौतम दांडगे (वय.17 रा.टेंभुर्णी) ह्या तिघांच्या डोक्याला जबर मार लागल्याने मरण पावले. दरम्यान त्यांना तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, डॉ. अमोल वाघ आणि डॉ. प्रवीण उगले यांनी तिघांनाही मृत घोषित केले. (Jalna News)

मृतदेहाची उत्तरीय तपासणी केल्यानंतर शोकाकुल वातावरणात रात्री उशिरा तिघांवरही हिवरा काबली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनास्थळी साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ यांच्यासह पोलीस कर्मचारी गजेंद्र भुतेकर, हरिदास मस्के दिनकर चंदनशिवे यांनी भेट देऊन अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली. तसेच सदर वाहनाचा चालक नंदकिशोर चव्हाण यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news