जालना : मजुराच्या मृत्यूचा बनाव केल्याप्रकरणी तिघांना अटक

Jalna Crime : अंबड पोलिसांची कारवाई
Jalna Crime News
मजुराच्या मृत्यूचा बनाव केल्याचा प्रकार अबंड तालुक्यात उघडकीस आला.Pudhari News Network
Published on
Updated on

शहागड : अबंड तालुक्यातील रवाना परडा दर्गा येथे विहिरीचे खोदकाम करणाऱ्या मंजूराच्या मृत्यूचा बनाव करून पोलिसाची दिशाभूल करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली. हेमराज मदनलाल बेगल (रा. रूपाली ता.हुलडा जि‌. भीलवाडा राजस्थान) असे मृत मजूराचे नाव आहे. याप्रकरणी विहीर मालक अन्वर गफार शेख (वय ३२, रा. रवना परंडा दर्गा ता. अंबड), विहीर ठेकेदार भवरलाल पन्नालाल जाट (वय ५५) विनोद भवरलाल जाट (वय २२, दोघे रा. राजस्थान) या तिघांना अटक करण्यात आली.त्यांना अंबड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

याबाबत अधिक माहिती अशी, दालमिल शिवार रवना परंडा (दर्गा) येथे हेमराजकडून विहिरीचे खोदकाम सुरू होते. विहिरीच्या पाण्यासाठी होल घेताना जेटलीन काडयांसह तोटे लावून बार उडवताना स्फोट झाला व विहिरीतील मोठा दगड उडून मजुरांच्या डोक्याला लागल्याने तो गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (दि.१४) दुपारी दोनच्या सुमारास घडली. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या हेमराजला अबंड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अतिरक्तस्राव होऊन त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. याबाबत पोलिसांनी माहिती विचारली असता, विहीर मालकासह ठेकेदाराने त्याचा विहीरीजवळ आकस्मिक मृत्यू झाल्याचे सांगितले. तसेच आमचे विहीरीचे काम दोन दिवसांपासून बंंद असल्याचे सांगत पोलिसांची दिशाभूल केली.

मजुराच्या शरीरावर आढळून आलेल्या जखमेवरून पोलिसांना संशय आल्याने त्यांनी विहीर मालकासह ठेकेदाराला ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली. यावेळी त्यांनी आम्ही त्याच्या मृत्यूचा बनाव केला असून हा मजूर विहिरीचे काम करत असताना आम्ही निष्काळजीपणाने विहीरीला होल पडताना जेटलीन कांड्याने स्फोट केला. व स्फोटादरम्यान विहीरीचा मोठा दगड लागून त्याचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर मजूराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने तिघांना अटक करण्यात आली. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गुरले हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news