
भोकरदन, पुढारी वृत्तसेवाः भोकरदन तालुक्यातील धावडा फत्ते- पूर रस्त्यावरील डोंगरातील जंगलात कोणालाही दिसणार नाही अशा ठिकाणी असलेल्या मोठमोठ्या गवतात चोरून आणलेले तीन ट्रॅक्टर अज्ञात चोरट्यांनी चोरून आणून लपवून ठेवले होते. पारध पोलिसांनी ते ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात जमा केले.
धावडा परिसरात असलेल्या जंगलात जनावरे चारणाऱ्या गुराख्यांना मोठमोठ्या गवतात लपविलेले तीन ट्रॅक्टर बेवारस स्थितीत दिसून आले. दोन दिवसांपासून ते तसेच पडून असल्याने या बाबतची माहिती पारध पोलिसांना देण्यात आली. पारधचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली धावडा बीट जमदार प्रदीप सरडे यांनी जंगलात लपवून ठेवलेले तिन्ही ट्रॅक्टर ताब्यात घेतले.