Teacher News : एसआयआरच्या कामामुळे गुरुजींचा दैनंदिन ताण वाढला

शिक्षकांकडील कामे काढून अन्य यंत्रणेकडे द्या
Teachers Government Duties
Teachers Government DutiesPudhari
Published on
Updated on

The teacher's daily stress increased due to the SIR-related work

टेंभुर्णी, पुढारी वृत्तसेवा : मतदार यादी विशेष पुनरीक्षण कार्यक्रमासाठी शिक्षकांवर अतिरिक्त ताण आल्याने शिक्षक संघटनांनी ही कामे शिक्षकांकडून काढून अन्य यंत्रणेकडे देण्याची मागणी जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील शिक्षकांनी केली आहे.

Teachers Government Duties
Beed news : परळीतील जिल्हा परिषद शाळा 'वाऱ्यावर'; ६२३ पैकी तब्बल ५५० शिक्षक मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण ड्युटीवर

जाफराबाद तालुक्यात १५० मतदान केंद्रे आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर निवडणूक विभागाने बी.एल.ओ म्हणून शिक्षकांची नियुक्ती केली आहे. शाळेच्या वेळेत अध्यापन केल्यानंतर मतदार यादी विशेष पुनरीक्षणाचे काम करावे लागत असल्याने शिक्षकांची दमछाक होत आहे. ही प्रक्रिया किचकट असल्याने आणि एका महिन्याच्या आत काम पूर्ण करण्याचे आदेश असल्याने बीएलओ असलेल्या शिक्षकांचा घाम फुटला आहे.

ग्रामीण भागात शेतीची कामे सुरू असल्याने मतदार उपलब्ध होत नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. राजकीय पक्षांकडून अनास्था असल्याने सर्व जबाबदारी शिक्षकांवर येऊन पडली आहे. एक हजारांपेक्षा जास्त मतदार असलेल्या गावांमध्ये मदतीसाठी अंगणवाडी मदतनिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनीही संबंधित शिक्षकांना मदत न करता या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आहे.

Teachers Government Duties
Sambhajinagar News : वाकला जि.प. शाळेला ग्रामस्थांनी ठोकले कुलूप

शिक्षक संघटनेची मागणी

तालुकाध्यक्ष नसीम शेख म्हणाले, की, मतदार यादी पुनरीक्षणाचे काम इतके किचकट आहे की शिक्षकांना शाळा करून हे काम करणे शक्य नाही. याचा विपरीत परिणाम शिक्षकांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होत आहे. यासाठी हे काम शिक्षकांकडून काढून इतर यंत्रणेकडे द्यावे. एका महिन्यात हे काम होणे शक्य नसल्याने कालावधी वाढवून देणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news