एक दिवस गावासाठी उपक्रम

राजेगावात 'मोबाईल बंद, अभ्यास चालू' मोहिमेचीही सुरुवात
jalna news
एक दिवस गावासाठी उपक्रमfile photo
Published on
Updated on

The 'Mobile Off, Study On' campaign has also been launched in Rajegaon

घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील राजेगाव येथे 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान" अंतर्गत राबविण्यात आलेल्या "एक दिवस गावासाठी" या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोबाईल बंद अभ्यास चालू मोहिमेस सुरूवात करण्यात आली.

jalna news
'सियावर रामचंद्र की जय'चा शहरात जयघोष

गावाच्या स्वच्छता व सौंदर्याकरणासाठी आयोजित या उपक्रमात लहानांपासून जेष्ठांपर्यंत सर्वांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. सकाळी लवकर ग्रामस्थांनी एकत्र येत गावातील प्रमुख रस्ते, शाळा परिसर, मंदिर परिसर तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली.

हातात झाडू, फावडे घेत ग्रामस्थांनी श्रमदान करत स्वच्छतेचा संदेश दिला. "आपलं गाव, आपली जबाबदारी" या भावनेतून सर्वांनी एकोप्याने गाव स्वच्छ ठेवण्याचा संकल्प केला. विशेषतः तरुण वर्गाच्या पुढाकारामुळे उपक्रम अधिक प्रभावी ठरला, तर जेष्ठ नागरिकांनी मार्गदर्शन करत सहभाग नोंदवला. या उपक्रमामुळे राजेगाव स्वच्छ, सुंदर आणि आदर्श गावाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे स्पष्ट झाले. पुढील काळात दर रविवारी सकाळी ७ ते ९ या वेळेत नियमित स्वच्छता अभियान राबवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.

jalna news
MLA Suresh Dhas : विकासासाठी गट-तट विसरून कामाला लागा

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी गावात एक अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. दररोज सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत 'मोबाईल बंद, अभ्यास चालू' हा नियम अमलात आणण्यात येणार आहे. या वेळेत विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून दूर राहून एकाग्रतेने अभ्यास करावा, असे आवाहन ग्रामपंचायत व शिक्षक वर्गाकडून करण्यात आले आहे.

या उपक्रमाची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे सायंकाळी ७ वाजता आणि रात्री १० वाजता सायरनद्वारे सूचना दिली जाणार असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेची जाणीव राहून नियमांचे पालन करणे सोपे होणार आहे. मोबाईलच्या अति वापरामुळे अभ्यासात होणारे दुर्लक्ष लक्षात घेऊन ग्रामपंचायत, पालक व ग्रामस्थांच्या संयुक्त पुढाकारातून हा निर्णय घेण्यात आला आहे.

पाठिंबा दर्शविला

पालकांनीही या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत आपल्या मुलांना नियोजित वेळेत मोबाईलपासून दूर ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. तसेच गावातील शिक्षकांनी मार्गदर्शन करत या उपक्रमाला सक्रिय पाठिंबा दर्शविला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news