महाविस्तार एआय ॲपमुळे शेती अधिक वैज्ञानिक व फायदेशीर : के. एल. घनवट

घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली येथे कृषी विभागाच्या वतीने महाविस्तार एआय अॅपबाबत माहिती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
jalna news
महाविस्तार एआय ॲपमुळे शेती अधिक वैज्ञानिक व फायदेशीर : के. एल. घनवटfile photo
Published on
Updated on

The Mahavistar AI app makes farming more scientific and profitable: K. L. Ghanwat

घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा :

शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व्हावा, या उद्देशाने कृषी विभागाच्या वतीने सुरू करण्यात आ-लेले 'महाविस्तार एआय' मोबाईल अॅप शेती व्यवसाय अधिक वैज्ञानिक, नियोजनबद्ध व फायदेशीर ठरण्यास उपयुक्त ठरत आहे, असे प्रतिपादन मंडळ कृषी अधिकारी के. एल. घनवट यांनी केले.

घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली येथे कृषी विभागाच्या वतीने महाविस्तार एआय अॅपबाबत माहिती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहायक कृषी अधिकारी पी. एस. काळे यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना अॅपच्या वापराबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

महाविस्तार एआय अॅपमध्ये पीकसंरक्षण, हवामान अंदाज, खत व्यवस्थापन, बियाणे निवड, रोग व कीड नियंत्रण तसेच बाजारभाव यांसारख्या महत्त्वाच्या सुविधांचा समावेश आहे. विशेष म्हणजे एआय तंत्रज्ञानावर आधारित चॅटबॉटच्या माध्यमातून पिकांवरील समस्यांनुसार शेतकऱ्यांना तत्काळ व अचूक सल्ला मिळतो, ही या अॅपची मोठी जमेची बाजू आहे. यावेळी शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

शेतकऱ्यांनी त्यांच्या रोजच्या शेती कामांमध्ये कोण कोणत्या बाबी कराव्या हे अॅपच्या माध्यमातून समजेल. विशेष म्हणजे उत्पन्न निघाल्यावर त्यांचा मार्केटिंगचा विषय असतो, कोणत्या बाजार समितीमध्ये काय भाव आहे, आपला शेतमाल विकायला पाहिजे की थांबवायला पाहिजे हे चॅटबॉटच्या माध्यमातून समजू शके, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हे अॅप डाऊनलोड करावे.
-पी. एस. काळे, सहायक कृषी अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news