

The land belonging to the Jalna factory should be given to the farmers
जालना, पुढारी वृत्तसेवा : रामनगर येथील जालना सहकारी साखर कारखान्याची जागा सध्या ईडीच्या ताब्यात आहे. दुसरीकडे ईडीकडून कारखान्याच्या जमीन खरेदी विक्री व्यवहाराच्या चौकशीचे गुऱ्हाळ गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्याने कारखाना सभासद शेतकरी सर्व लाभापासून वंचित आहेत, त्यामुळे शासनाने ईडीच्या ताब्यातून कारखान्याची जमीन शेतकऱ्यांना परत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या मागणीसाठी गांधी चमन येथे मंगळवार, दि. २७ रोजीपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.
महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शेतकरी, सभासद आणि कामगारांनी उपोषण सुरू केले. या आंदोलनात अंकुशराव देशमुख, अंकुशराव राऊत, लक्ष्मणराव शिंदे, कैलास फुलारी, नारायण वाडेकर, राज अहर्षि प्रल्हाद पडूळ, अरुण वझरकर, प्रल्हाद हेकाडे, सुभाष कोळकर, सतीश देशमुख, अॅड. सोपानराव भांदरगे आदी सहभागी झाले.