जालना : तलाठ्यासाठी लाच स्वीकारताना दलाल ए.सी.बी. च्या जाळ्यात, तलाठी फरार

ACB trap broker: तीन हजारांच्या लाचेची केली होती मागणी
Jalna Bribe News
प्रातिनिधीक छायाचित्रFile Photo
Published on
Updated on

पारध : भोकरदन तालुक्यातील पारध बू.येथील एका महिलेच्या जमिनीचा फेरफार करण्यासाठी पारध सजाचे तलाठी अभय मधुकरराव कुलकर्णी यांनी संबंधित महीलेकडे तीन हजार रुपये लाचेची मागणी केली होती. मात्र ही रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून या संदर्भात तक्रार केली होती.

दरम्यान, सोमवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे छ.संभाजीनगर परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे,अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक बी.एम. जाधवर,पोलीस अंमलदार भालचंद्र बिनोरकर ,गणेश चेके ,अशोक राऊत यांनी सकाळी पारध तलाठी कार्यालयात सापळा रचून तडजोडी अंती ठरलेली लाच रक्कम २५००/- रुपये स्विकारताना तलाठी कुलकर्णी यांचा खाजगी दलाल कृष्णा गणेश दळवी रा.येवता,ता.जाफराबाद याच्या मार्फत स्विकारताना रंगेहाथ पकडले.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,पारध येथील तक्रारदार यांनी त्यांच्या आईने खरेदी केलेल्या जमिनीचा फेरफार करायचा म्हणून तलाठी कुलकर्णी यांच्याकडे विनंती केली. मात्र या कामासाठी तीन हजार रुपये द्यावे लागतील अशी लाचेची मागणी केली. तडजोडी अंती अडीच हजार रुपये देण्याचे ठरले .ती लाचेची रक्कम स्विकारताना तलाठी कुलकर्णी यांनी ठेवलेला खाजगी दलाल कृष्णा दळवी यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जाळ्यात ओढले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news