Illegal hawkers railway : अनधिकृत फेरीवाल्यांना रेल्वेचा दणका; ४७ जणांवर कारवाई

३६ हजार ८५० रुपयांचा दंड; नियमित कारवाई मोहीम हाती घेतली जाणार
Railway
Railway Pudhari
Published on
Updated on

जालना : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात रेल्वे स्थानके आणि गाड्यांमधील अनधिकृत फेरीविक्रीविरोधात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत ४७ फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत संबंधितांकडून ३६ हजार ८५० रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला.

प्रवाशांच्या सुरक्षिततेसह रेल्वे स्थानकांची स्वच्छता आणि सुरळीत व्यवस्था कायम राखण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या निर्देशानुसार नांदेड विभागात अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली.

Railway
Jalna Agriculture News : आभाळ भरून येतंय, पण पाऊस गायबच!

१३ ते १९ जुलै या कालावधीत झालेल्या या कारवाईत ४७ अनधिकृत फेरीवाल्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ₹३६ हजार ८५० इतका दंड वसूल करण्यात आला.

दरम्यान, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना खाद्यपदार्थ व इतर वस्तूंची खरेदी अधिकृत रेल्वे विक्रेते, कॅन्टीन व स्टॉल्स यांच्याकडूनच करण्याचे आवाहन केले आहे. तसेच अनधिकृत फेरीवाले आढळल्यास रेल्वे कर्मचारी किंवा रेल्वे हेल्पलाईन क्रमांक १३९ वर तातडीने माहिती देण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

Railway
Chhatrapati Sambhajinagar crime : पत्नीला आणण्यासाठी गेला अन् २० मिनिटांत चोरट्यांनी घर फोडले

या दरम्यान राबविण्यात आली विशेष मोहीम

ही विशेष मोहीम मनमाड–जालना, पूर्णा–अकोला, नांदेड–पूर्णा, पूर्णा–छत्रपती संभाजीनगर, मुदखेड–छत्रपती संभाजीनगर, पूर्णा–वाशिम, आदिलाबाद–मुदखेड आणि पूर्णा–परळी वैजनाथ या रेल्वे मार्गांवर राबविण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news