जिल्ह्यात श्रीराम नवमी उत्साहात साजरी

शहरात रामभक्तांच्यावतीने काढण्यात आल्या मिरवणुका, पोलिसांचा चोख बंदोबस्त
jalna news
जिल्ह्यात श्रीराम नवमी उत्साहात साजरीfile photo
Published on
Updated on

Shri Ram Navami Celebrated with Enthusiasm in the District

जालना, पुढारी वृत्तसेवा : रामनवमीचा पवित्र सण जालना शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. शहरातील विविध मंदिरांमध्ये सकाळपासूनच भाविकांची गर्दी पहायला मिळाली. रामभक्तांनी श्रीरामाच्या नामस्मरणात आणि भजन-कीर्तनात तल्लीन होत सण साजरा केला.

jalna news
'सियावर रामचंद्र की जय'चा शहरात जयघोष

जालना शहरातील आनंदवाडी परिसरात रामनवमीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात रामदास महाराज आचार्य यांचे कीर्तन पार पडले. त्यांच्या प्रभावी आणि ओजस्वी कीर्तनामुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले. "राम जन्मला ग सखे, राम जन्मला" या गजरात श्रीराम जन्माचा पाळणा भाविकांनी मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने म्हटला. यावेळी महिला, युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांची मोठी उपस्थिती होती. जालना शहरातून हिंदुत्ववादी संघटना व रामभक्तांनी श्रीरामाच्या प्रतिमेची मिरवणूक काढली.

सणाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहरातील प्रमुख ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवण्यात आली होती, तसेच मंदिर परिसरातही सुरक्षा व्यवस्था काटेकोर करण्यात आली होती.

jalna news
Jalna News : शहरासह जिल्हाभरात महाशिवरात्री उत्साहात

दरम्यान, घनसावंगी तालुक्यातील जांव समर्थ येथील प्राचीन राममंदिरातही रामजन्माचा सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. पारंपरिक विधी, आरती आणि भजनाच्या कार्यक्रमांनी वातावरण भारावून गेले होते. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने दर्शन घेत जालना शहरात रामभक्तांच्यावतीने रथामध्ये श्रीरामाच्या प्रतिमेची मिरवणुक काढण्यात आली. या मिरवणुकीत दुचाकीवर मोठ्या संख्येने युवक, युवर्तीसह भाविक भक्त सहभागी झाले होते. विविध मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्रीराम मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

शहरातील बडी सडक येथील प्रभू श्रीराम मंदिरात भक्तांची मोठी गर्दी उसळली होती. आ. अर्जुनराव खोतकर यांनी मंदिरात उपस्थित राहून यावेळी प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले.यावेळी त्यांनी प्रभू श्रीराम यांच्या चरणी नतमस्तक होत राज्यातील तसेच जालना जिल्ह्यातील नागरिकांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी लाभावी, अशी प्रार्थना केली. मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रम, भजन-कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. भक्तिमय वातावरणात नागरिकांनी मोठ्या श्रद्धेने श्रीरामांचे दर्शन घेतले. रामनामाच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता, विविध सामाजिक आणि धार्मिक संस्थांच्या वतीनेही रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला यावेळी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news