Sant Gajanan Maharaj Palkhi : 'गण गण गणात बोते'च्या जयघोषाने जालना दुमदुमले !

संत गजानन महाराज पालखीचे शहरात स्वागत; शिस्तबद्ध वारकऱ्यांनी वेधले लक्ष
Sant Gajanan Maharaj Palkhi
Sant Gajanan Maharaj Palkhi : 'गण गण गणात बोते'च्या जयघोषाने जालना दुमदुमले !file photo
Published on
Updated on

Sant Gajanan Maharaj Palkhi welcomed in the city

जालना, पुढारी वृत्तसेवा : पंढरपूर येथून परतीच्या मार्गावर असलेल्या शेगाव येथील श्री संत गजानन महाराज पालखीचे रविवारी (२) जालना शहरात आगमन झाले. पालखी शहरात दाखल होताच 'गण गण गणात बोते'च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. पालखीच्या स्वागतासाठी शहरवासीयांनी मोठी गर्दी केली होती. महापौर वंदना मगरे व उपमहापौर राजेश राऊत यांनी पालखीचे स्वागत केले. आमदार अर्जुनराव खोतकर यांच्यासह विविध मान्यवरांनी पालखीचे दर्शन घेतले.

Sant Gajanan Maharaj Palkhi
Raigad news: कोलाड उड्डाण पुलावरून ट्रेलर पलटी; सुदैवाने कोणतेही जीवित हानी नाही

पालखी सोहळ्याच्या आगमनानिमित्त शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. पालखी ज्या मार्गावरून जाणार होती, त्या मार्गावर नागरिकांनी आकर्षक रांगोळ्या काढून स्वागताची तयारी केली होती. अनेक ठिकाणी भाविकांनी पालखीवर पुष्पवृष्टी केली. रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून नागरिकांनी पालखीचे दर्शन घेतले.

पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या शिस्तबद्ध वारकऱ्यांनी जालनेकरांचे लक्ष वेधून घेतले. टाळ मृदंगाचा गजर, अभंग-मजन आणि भगव्या पताकांनी पालखी सोहळ्याला भक्तिमय स्वरूप प्राप्त झाले होते.

Sant Gajanan Maharaj Palkhi
Jalna News : वाकडी येथील पाणंद रस्त्याची दुरवस्था; चिखलामुळे शेतकऱ्यांची कोंडी: तहसील व ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष

पंढरपूरहून परतीच्या प्रवासातील वारकऱ्यांचा उत्साह आणि शिस्त पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. पालखीच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर विविध विक्रेत्यांनी पालखी मार्गावर दुकाने थाटली होती.

खाद्यपदार्थ, खेळणी, विविध वस्तूंसह लहान-मोठ्या वस्तूंची दुकाने सजली होती. त्यामुळे पालखी मार्गाला यात्रेचे स्वरूप आले होते. नागरिक आणि भाविकांनी या दुकानांमध्ये खरेदीसाठीही गर्दी केली. पालखी मिस्वणुकीत सहभागी असलेल्या सजविलेल्या घोड्यांनी विशेष आकर्षण निर्माण केले. हे घोडे पाहण्यासाठी बच्चे कपंनीनी मोठी गर्दी केली होती. गजानन महराज पालखीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या दोन महिलांचे मंगळसूत्र चोरट्धांनी लांबविल्याची घटना घडली.

घोगरे स्टेडियमवर पहिला मुक्काम

पालखीचा रविवारी जुना जालना येथील नगरपालिका घोगरे स्टेडियमवर मुक्काम राहणार आहे. सोमवारी (१०) पालखीचा दुसरा मुक्काम शहरातील जेईएस महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. त्यानंतर पालखी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होणार आहे. पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून वाहतूक व बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news