

Samruddhi Mahamarg Truck Workers vehicle collision
जालना : समृद्धी महामार्गावर जालन्याजवळ झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. नागपूरहून मुंबईकडे जात असलेल्या भरधाव ट्रकने कामगारांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला.
अपघाताची माहिती मिळताच जालना तालुका पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात तीन जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जालना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.