Jalna Crime : बचतगटाच्‍या महिलांचे नऊ लाख रुपये चोरले; गुन्‍हा दाखल

एसबीआयमधून पैसे काढल्यानंतर महिंद्रा पिकअपमधून रोकड लंपास
Jalna crime
बचतगटाच्‍या महिलांचे नऊ लाख रुपये चोरले; गुन्‍हा दाखलpudhari photo
Published on
Updated on

भोकरदन : तालुक्यातील कोठा जहागीर येथील जय योगेश्वर महिला बचतगटाच्या महिलांनी कष्टाने जमा केलेली तब्बल नऊ लाख रुपयांची रोकड भारतीय स्टेट बँकेतून काढल्यानंतर काही क्षणांतच चोरीला गेल्याने भोकरदन तालुक्यात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे बचतगटाच्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चोरट्याचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, कोठा जहागीर येथील जय योगेश्वर महिला बचतगटातील सुमारे दहा महिला गुरुवारी भोकरदन येथील भारतीय स्टेट बँकेत पैसे काढण्यासाठी आल्या होत्या. बँकेतून नऊ लाख रुपयांची रोकड काढल्यानंतर त्या जाफराबाद रोडवरील एका ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबल्या.

Jalna crime
Beed Crime : दिवसा रेकी, रात्री घरफोडी; आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश

यावेळी त्यांनी रोकड असलेली बॅग महिंद्रा पिकअप वाहनात ठेवली होती. काही वेळानंतर वाहनातील रोकड गायब झाल्याचे लक्षात येताच महिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी धावपळ उडाली. महिलांनी आजूबाजूच्या परिसरात शोधाशोध केली. मात्र चोरट्याचा कोणताही पत्ता लागला नाही. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून चोरीचा तपास सुरू आहे.

Jalna crime
Chhatrapati Sambhajinagar Crime : १८ दिवस डिजिटल अरेस्ट; वृद्धेला १२ लाखांचा गंडा

न.प.च्‍या भूमिकेबाबत संताप

विशेष म्हणजे, काही वर्षांपूर्वी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध झाला होता. मात्र, विविध कारणांमुळे तो खर्च न झाल्याने निधी परत गेल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या भूमिकेबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने आता तरी भोकरदनमध्ये सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार का? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news