Jalna News : वहिवाटीचा रस्ता बंद; रणरागिणी पेटल्या, शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन

तहसीलदारांचे येत्या दोन महिन्यांत रस्ता मोकळा करून देण्याचे आश्वासन
Jalna News
Jalna News : वहिवाटीचा रस्ता बंद; रणरागिणी पेटल्या, शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलनFarmer News
Published on
Updated on

Road closed; Jalsamadhi Farmers' agitation

भोकरदन, पुढारी वृत्तसेवा : जुना वहिवाटिचा रस्ता बंद केल्याने शेतात ये जा करण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता खुला करण्यासाठी वारंवार निवेदन, विनंत्या करूनदेखील कारवाई होत नसल्याने अखेर गुरुवार दि. ३ रोजी रणरागिणींनी केदारखेडा येथील तलावात उतरून जलसमाधी आंदोलन केले. त्वरित तहसीलदारांनी आंदोलनस्थळी भेट दिली. येत्या दोन महिन्यांत रस्ता मोकळा करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Jalna News
Jalna News : वाळूत स्वतःला गाडून आंदोलन, घरकुलासाठी वाळू मिळण्यासाठी लाभार्थी आक्रमक

दरम्यान, केदारखेडा येथील विठ्ठल साहेबराव जाधव, सखुबाई साहेबराव जाधव, विनायक गोविंदा सावंत, मुकुंदा गोविंदा सावंत यांच्यासह गट नंबर १८०, १९२, १९०, १७६, १६२, १८१, १६४,१८२, यासह इतर गटातील शेतकऱ्यांना ये जा करण्यासाठी जुना वहिवाटीचा रस्ता होता. मात्र, तो रस्ता बंद करण्यात आला.यापूर्वी भोकरदन तहसील कार्यालयात रस्ता मोकळा करून देण्याच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आले होते. शेतामध्ये जाणारा जुना वहीवाटीचा रस्ता बंद केल्याने तो तत्काळ मोकळा करून पूर्ववत करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. मागणी मान्य झाल्यास जलसमाधी आंदोलन करण्याचाही इशारा देण्यात आला होता. मात्र, या संदर्भात तहसील कार्यालयाने कोणतेही ठोस पाऊले उचले नाही.

यामुळे शेतकऱ्यांनी गुरुवार दि. ३ रोजी सकाळी दहा वाजता जलाशय क्रमांक दोन केदारखेडा येथे जलसमाधी आंदोलन केले. महसूल प्रशासनाने दखल घेऊन दुपारनंतर तहसीलदार बालाजी पप्पुलवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी जाऊन आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेतली. संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन येणाऱ्या दोन महिन्यांच्या काळात रस्ता पूर्ववत करून देण्यात येईल असे आश्वासन दिले, त्यानंतर शेतकऱ्यांनी हे आंदोलन मागे घेण्यात आले.

Jalna News
Jalna Crime News : पिस्तूल खरेदी विक्री करणारे इसम जेरबंद

गट क्रमांक १८०, १९२, १९० यासह इतर शिवारात आमची शेती आहे. पूर्वी शेती करण्याठी जुना वहिवाटेचा रस्ता होता. मात्र, तो रस्ता बंद केल्याने या शिवारातील शेतकऱ्यांना शेतीची कामे, मालवाहतूक करताना मोठी अडचण निर्माण झाली. ही समस्या तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांनादेखील सांगण्यात आली. त्यांनी वेळीच उपाययोजना न केल्याने जलसमाधी आंदोलन करण्यात आले.

सखुबाई साहेबराव जाधव, शेतकरी, केदारखेडा आश्वासनानंतर जलसमाधी आंदोलन मागे शेतशिवारात जाण्याचा वहिवाटेचा रस्ता बंद करण्यात आल्याने केदारखेडा येथील शेतकऱ्यांनी गुरुवारी केदारखेडा येथील तलावात जलसमाधी आंदोलन केले होते. या आंदोलनात महिलांचा लक्षणीय सहभाग होता. या आंदोलनस्थळी महसूल प्रशासनाच्यावतीने तहसीलदार बालाजी पप्पुलवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी जाऊन आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेतली. संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन येणाऱ्या दोन महिन्यांच्या काळात रस्ता पूर्ववत करून देण्यात येईल, असे आश्वासन दिले त्यानंतर शेतकऱ्यांनी हे आंदोलन मागे घेण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news