Jalna News : सरकारी जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित

आमदार दानवे यांची माहिती; 'महाराजस्व अभियान' शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
Jalna News
Jalna News : सरकारी जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमितfile photo
Published on
Updated on

Residential Encroachments on Government Land Regularized

जाफराबाद, पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाने ३१ डिसेंबर २०११ पूर्वीच्या सरकारी जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यामुळे अनेकांना या निर्णयाने दिलासा मिळणार आहे. असे वक्तव्य आमदार संतोष दानवे यांनी केले.

Jalna News
Agriculture demands Sambhajinagar : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जोरदार चर्चा

जाफराबाद नगरपंचायत कार्यालय परिसरात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत नगरपंचायत व महसूल मंडळस्तरीय समाधान शिबिर उत्साहात पार पडले. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध महसुली अडचणी, जमीन विषयक प्रश्न, शासकीय योजना व प्रमाणपत्रांबाबत मार्गदर्शन घेतले. शिबिरात विविध कागदपत्रांचे वितरण आमदार संतोष दानवे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार दानवे म्हणाले, की ५०० चौरस फुटांपर्यंतची निवासी अतिक्रमणे मोफत नियमित करण्यात येणार असून त्यापेक्षा जास्त क्षेत्रासाठी रेडी रेकनर दराच्या १० टक्के रक्कम भरून जमीन नावावर करून घेता येणार आहे, 'अशी माहिती त्यांनी दिली. कृषी विभागामार्फत ट्रॅक्टर व विविध शेती अवजारांसाठी मोठ्या प्रमाणावर अनुदान उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण उप-अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

Jalna News
कामात दिरंगाई करू नकाः आमदार अब्दुल सत्तार

कार्यक्रमात तहसीलदार अविनाश लोढे, नगरपंचायत मुख्याधिकारी सुरज बिस्किटे व दीपक बाकडे यांनीही मनोगत व्यक्त करून महसूल व नागरी सुविधा योजनांची माहिती दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी बी. सरवन, नगराध्यक्ष कविता दीपक वाकडे, नायब तहसीलदार सुरेश मिसाळ, पुरवठा निरीक्षक मीना चव्हाण, कृषी अधिकारी अमोल शिंदे, सुरेश दिवटे, महसूल मंडळाधिकारी शिवाजी काळे, ग्रामविकास अधिकारी अंकुश सोनुने, विजय परीहार, रवी हिवाळे, गोविंदराव पंडित, शेख कौसर, उद्धव दूनगहू, सचिन गुळवे, किशोर खंदारे, तहसील कार्यालय व नगरपंचायतीचे अधिकारी-कर्मचारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोरे मॅडम यांनी केले.

पाणंद रस्त्याची कामे मार्गी लावा

शासनाने पाणंद रस्ते मोकळे करण्याचा निर्णय घेतला आहे. तहसीलदार व महसूल अधिकाऱ्यांना या संदर्भात आदेश देण्यात आले आहेत. शेतात जाण्याच्या हक्कात अडथळा आणणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते, प्रत्येकाला आपल्या शेतात जाण्याचा अधिकार आहे. विकासकामे, पाणी, रस्ते आणि शेतीसाठी सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे, असे आमदार दानवे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news