Jalna News : राहुल गांधींनी अराजकतेऐवजी दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी काम करावे : खा. डॉ. गोपछडे

काँग्रेसने संविधानाचा राजकीय स्वार्थासाठी वापर करू नये : जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे
Jalna News
Jalna News : राहुल गांधींनी अराजकतेऐवजी दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी काम करावे : खा. डॉ. गोपछडेfile photo
Published on: 
Updated on: 

Rahul Gandhi should work for farmers in drought-stricken areas instead of chaos: MP Dr. Gopchhade

जालना, पुढारी वृत्तसेवाः देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार देशाच्या सर्वांगीण विकासासाठी भक्कमपणे कार्यरत आहे. मात्र, विरोधकांकडून विविध मुद्द्यांवर जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राहुल गांधी यांनी जंतरमंतर मैदानावर आंदोलन करून देशात अराजकता निर्माण करण्यापेक्षा महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी काम करावे आणि शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घ्याव्यात, असा सल्ला जालना महानगर प्रभारी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी दिला.

Jalna News
Jalna News : शॉर्ट सर्किट झाल्यामुळे साडेचार एकर ऊस जळून खाक

लोकशाही वाचवा अराजकता हटवा अभियानांतर्गत भारतीय जनता पार्टी जालना महानगर च्या वतीने राष्ट्र चिंतन संवाद बैठक सोमवार, दि. १६ सकाळी ११ वा भाजपा जालना महानगर प्रभारी खा.डॉ. अजित गोपछडे यांच्या राष्ट्रचिंतन मंबाद बैठक जालनाः राष्ट्रचिंतन संवाद बैठकीस उपस्थित मान्यवर.

संविधान देशाचे एकतेचे प्रतिक भास्कर दानवे म्हणाले की, संविधान हे देशाच्या एकतेचे, अखंडतेचे आणि लोकशाही मूल्यांचे प्रतीक आहे. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समान अधिकार, न्याय आणि स्वातंत्र्य दिले आहे. मात्र काँग्रेसकडून याच संविधानाचा राजकीय स्वार्थासाठी वापर केला जात असून, जनतेमध्ये गैरसमज निर्माण करण्याचे काम केले जात असल्याचा आरोप केला.

Jalna News
B. K. Shivani didi : 'विचार बदला, आयुष्य नक्कीच बदलेल'

प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे, रामेश्वर पाटील भांदरगे, बद्रीनाथ पठाडे, सभापती अशोक पांगारकर, जिल्हा सरचिटणीस अमोल कारंजेकर, शिवप्रकाश चितळकर, वसंत शिंदे, सुनील पवार, अरुणाताई जाधव, डॉ. मिसाळ, अर्जुन गेही, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष शुभांगीताई देशपांडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष गोविंद भताने, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष सतीश केरकळ, मंडळ अध्यक्ष सुनील खरे, संजय डोंगरे, अमोल धानुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी नगरसेवक महावीर ढक्का, महेश निकम, रमेश गौरक्षक, कल्याण भदनेकर, शशिकांत घुगे, भगवान चांदोडे, शिवराज नारीयलवाले, संजय पाखरे, सिद्धिविनायक मुळे, सुशीलाताई दानवे, अड रिमा खरात, पूनम स्वामी, सखुबाई पणबिसरे, वर्षा राऊत, सुलोचना गोर्डे, रूपा कुरील, स्नेहलता कामड, या बैठकीस भाजपाचे पदाधिकारी, विविध आघाड्यांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.