Jalna News : नागरिकांना विहित मुदतीत तातडीने गुणवत्तापूर्ण सेवा द्या : डॉ. जाधव

शासकीय सेवा अधिक सुलभ व गतिमान करण्याचे निर्देश
Jalna News
Jalna News : नागरिकांना विहित मुदतीत तातडीने गुणवत्तापूर्ण सेवा द्या : डॉ. जाधवfile photo
Published on: 
Updated on: 

Provide quality services to the citizens promptly within the prescribed time frame: Dr. Jadhav

जालना, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत नागरिकांना विविध शासकीय सेवा पारदर्शकपणे, सुलभतेने आणि निर्धारित कालावधीत उपलब्ध करून देण्यास प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य द्यावे. नागरिकांना शासकीय कामांसाठी अनावश्यक हेलपाटे मारावे लागू नयेत, तसेच प्रलंबित अर्जाचा नियमित आढावा घेऊन त्यांचा तातडीने निपटारा करावा, असे निर्देश राज्य सेवा हक्क आयोगाच्या छत्रपती संभाजीनगर विभागाचे आयुक्त डॉ. किरण जाधव यांनी दिले.

Jalna News
Aadhaar Seva Kendra : आधार सेवा केंद्राचा मनमानी कारभार

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्याअंतर्गत देण्यात येणाऱ्या सेवांचा आढावा घेताना डॉ. किरण जाधव बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल,

उपजिल्हाधिकारी सुकेशिनी पगारे, जालना उपविभागीय अधिकारी रामदास दौड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी संबंधित जिल्ह्यांतील महसूल, ग्रामविकास, नगरपालिका तसेच अन्य विभागांच्या अधिकाऱ्यांकडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांची माहिती घेण्यात आली.

Jalna News
Marigolds : शेतकऱ्याने दुष्काळातही फुलवली झेंडूची शेती

१२१२ सेवा ऑनलाईन उपलब्ध

राज्य सेवा हक्क अधिनियमांतर्गत १२१२ सेवा ऑनलाइन उपलब्ध असून, अधिकाधिक सेवांचे डिजिटायझेशन करून नागरिकांना ऑनलाइन अर्ज व आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी. कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यास अर्ज प्रलंबित न ठेवता संबंधित अर्जदाराशी संपर्क साधून त्रुटींची पूर्तता करून घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक विभागाने किमान २० टक्के सेवा निर्धारित कालावधीत देण्याचे उद्दिष्ट ठेवावे. प्रलंबित अर्जाचा दररोज आढावा घेऊन शक्य तितक्या प्रकरणांचा निपटारा करावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.