

Preference given to sowing soybeans with the help of a pair of bullocks
पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील सेलूदसह परिसरात खरीप हंगामातील सोयाबीन पेरणीच्या कामांना वेग आला आहे. मान्सूनच्या पहिल्याच पावसाने जमीन ओलावल्याने शेतकरी बैलजोडीच्या साह्याने पारंपरिक पद्धतीने पेरणी करताना दिसत आहेत. सेलूद सह परिसरात या भागातील शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरऐवजी बैलजोडीला प्राधान्य दिले आहे.
डिझेलच्या वाढत्या दरामुळे व लहान-मध्यम शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर नसल्याने बैलांच्या साह्याने पाभरीने टोकण पद्धतीने सोयाबीनची पेरणी केली जात आहे. एकरी ३० ते ३५ किलो बियाणे वापरले जात असून ओळीतील अंतर दीड फूट ठेवले जात आहे.
शेतकरी "बैलजोडीने पेरणी केल्यास बियाणे वाया जात नसून खर्चही कमी येतो. ट्रॅक्टरचे भाडे परवडत नाही म्हणून पारंपरिक पद्धतच बरी सध्या सेलूद परिसरात पेरणी सुरू झाली असून पुढील आठवडाभरात पेरणी आटोपणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. पावसाने साथ दिल्यास यंदा सोयाबीनचे उत्पादन चांगले येईल, अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत.