

आन्वा : भोकरदन तालुक्यात आंब्याला मोहोर येण्यास सुरुवात झाली असून सुरुवातीच्या अवस्थेत आंब्यावरील मोहोरावर किडींचा व रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहेत. आंब्याच्या मोहोरावर रसशोषक किर्डीमध्ये तुडतुडे, फुलकिडे व कोळी या प्रमुख नुकसानकारक किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने आंबा उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत.
आंबा पिकाच्या मोहरावर किडीचा प्रादुर्भाव झाल्याने लहान फळांची गळ होत आहे. यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम होऊन नुकसान होण्याची शक्यता आहे.आंबा मोहरावर बुरशी दिसून येत आहे. या रोगाला भुरी रोग असे नाव आहे. डिसेंबर-जानेवारीत आंब्याला मोहर फुटल्यावर या बुरशीची वाढ होते. कोवळ्या पानांवरसुद्धा या रोगाचा प्रादुर्भव होतोः वाऱ्यासोबत या बुरशीचा प्रसार होतो.
आंब्याच्या मोहोरावर येणारा भुरी हा रोग बुरशीमुळे होतो. जेव्हा आंब्याला मोहर येतो त्याचवेळी या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असतो. या रोगामुळे मोहराचे देठ, फुले व लागलेल्या लहान फळांची गळ होते. यामुळे फळांच्या धारणेवर वाईट परिणाम दिसून येतो. आंबा पिकातील सर्वांत जास्त नुकसान या रोगामुळे होते.