Jalna Labour Employment Crisis : परतूर उपविभागीय कार्यालयासमोर लालबावटाचे धरणे आंदोलन

१७ गावांतील ४ हजार ३३५ मजुरांनी मागितले प्रत्यक्ष काम
Jalna Labour Employment Crisis
परतूर : येथील उपविभागीय कार्यालयासमोर मजुरांच्या विविध मागण्यांसाठी लालबावटाच्या नेतृत्वात आंदोलन करताना मजूर.pudhari photo
Published on: 
Updated on: 

परतूर :दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील मजुरांसमोर रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. परतूर तालुक्यातील १७ गावांतील तब्बल ४ हजार ३३५ मजुरांनी रोजगार हमीच्या कामांची प्रत्यक्ष मागणी केली आहे. मात्र, कामाची मागणी करूनही मजुरांना रोजगार उपलब्ध होत नसल्याने परतूर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र शेतमजूर व इतर ग्रामीण मजूर युनियन (लालबावटा) च्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी रोजगार हमीची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कामाची मागणी केलेल्या प्रत्येक गावात तातडीने रोजगार हमीची कामे सुरू करावीत. मजुरांना रोजगारासाठी दुसऱ्या गावात किंवा शहरात स्थलांतर करण्याची वेळ येऊ नये, बांधबंधिस्ती व जलसंधारणाच्या कामांचे मोठ्या प्रमाणात सेल्फ तयार करा.

Jalna Labour Employment Crisis
DMK BJP Deal Delimitation Bill: डीएमके - भाजप डील... कनीमोझी बनल्या मास्टर माईंड; परिसीमन विधेयकावर वर्षभरापासून सुरू होती चर्चा

प्रत्येक गावात रोजगार हमी योजनेंतर्गत मृद व जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात मंजूर करून कामांचा सेल्फ तयार करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली. या आंदोलनात मारोती खंदारे, सरिता शर्मा, भगवान कोळे, रवी भदर्गे, अशोक साळवे, शेख फरीदा, दिगंबर मोरे, महेमूद शेख,रमेश थोरात,लता काळदाते, मनीषा वाहूळे सीता आकात, जालिंदर राऊत, बाबा वंजारे, दत्ता राऊत शाम राऊत,इत्यादी महिला पुरुष आंदोलनात सहभागी होते.

मजुरांचे ठिय्या आंदोलन

यावेळी परतूर तहसीलदारांनी आंदोलकांशी मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करून त्यांना कामे देण्याचे लेखी आश्वासन दिले, मागण्यांसाठी मजुरांनी १२ ते ३ वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन केले, मजुरांच्या मागण्याबाबत कोणती कार्यवाही होते याकडे आता लक्ष आहे.

Jalna Labour Employment Crisis
Jalna Water Shortage : सावधान ! पाण्याचा अपव्यय टाळा; अनधिकृत उपसा केल्यास कारवाई

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.