Padmavati Dam Water Level : पद्मावती धरणात २० टक्केच पाणीसाठा

प्रकल्पाच्या पाण्यात दिवसेंदिवस मोठी घट, परिसरातील वीस गावांवर पाणीटंचाईचे संकट
Padmavati Dam Water Level
पद्मावती धरणात २० टक्केच पाणीसाठाpudhari photo
Published on
Updated on

भोकरदन : तालुक्यातील वालसावंगी परिसरातील पद्मावती येथील धरणात गतवर्षी पेक्षा यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने पावसाळ्याचा जून महिना संपत आला तरी धरणात केवळ २० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. धरणाला जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

भोकरदन तालुक्यातील अनेक गावांचा पाणीपुरवठा अवलंबून असलेल्या पद्मावती मध्यम प्रकल्पातील पाणीसाठ्यात दिवसेंदिवस मोठी घट होत आहे. धरणाच्या पाणीपातळीत घट होत असल्याने परिसरातील २० गावांवर पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यात पद्मावती परिसरातील नदी, नाले तुडुंब भरले नाही. धरणात पाणी साठ्यात वाढ व्हायला तयार नाही.

Padmavati Dam Water Level
Sangli News : बागायतदार, शेतकऱ्यांचा जीव टांगणीला

त्यामुळे रब्बी हंगामातील पिके लागवडीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे. तसेच फळ लागवडीकडे शेतकऱ्यांनी आपला मोर्चा वळविला होता. परंतु पद्मावती धरणात सध्या तरी वाढ व्हायला तयार नाही. धरणात पाणीसाठा नसल्यामुळे शेतकरी आनंदीत नाही. सध्या तरी धरणात वीस टक्के जवळपास पाणी साठा उपलब्ध असल्याने धरणातील पाणी साठ्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी गहू, हरभरा, मका लागवडीवर मोठ्या प्रमाणात भर दिला जाणार नसल्याचे सांगितले आहे.

तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू शकते. भोकरदन तालुक्यात अनेक धरणे अजूनही कोरडे ठाक आहे असले तरी पद्मावती धरणात मुबलक पाणी साठा कमी असल्याने अनेक गावांना टैंकरद्वारे पाणीपुरवठा केला जाऊ शकत नाही. असे चित्र असताना मात्र पद्मावती येथील धरणात कमी पाणीसाठा आहे.

परंतु ऐन दुष्काळाच्या तोंडावर धरणातून अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी व रब्बी हंगामातील पिकांना शेतकऱ्याकडून पिकाला पाणी दिले जात होते. धरणातील पाणीसाठा झपाट्याने घटत आहे. धरणात केवळ महिनाभर एवढाच पाणी साठा उपलब्ध आहे .

पाणीसाठा उपलब्ध असल्याने जुलैअखेरीस पाणी साठा पुरेल एवढेच क्षमता धरणात असून परिसरातील २० गावांचा पिण्याच्या पाण्यासह मिटवणारे धरणच कोरडेठाक पडण्याची चिन्हे दिसून येत आहे. तसेच हंगामात लागवड केलेल्या पिकांना तुषार सिंचनाद्वारे पिकांना पाणी देण्याचा परिसरातील शेतकऱ्यांचा प्रश्न असतो, परंतु पाणी उपसा थांबल्यास आगामी काळातील पिण्याचा प्रश्न सुटू शकतो परंतु पाणी उपसा थांबवण्याची गरज आहे.

Padmavati Dam Water Level
Thane water shortage : धरणांच्या शहापुरात टँकरमुक्ती केव्हा ?

वालसावंगी व परिसरात सुरुवातीपासून जोरदार पाऊस न झाल्याने नदी, नाले ओसंडून न वाहिल्याने विहिरीची पाणी पातळीत कमी आहे. त्यामुळे दरवर्षी शंभर टक्के भरणारे धरण अजूनही वीस टक्के पाणी आहे. मात्र आता पावसाळ्याता जून महिना संपत आला तरी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली नाही. रब्बी हंगामात पिकांना पाणी देण्यासाठी गावकऱ्यांना पाणीटंचाई जाणवू शकते.

बाळासाहेब मोकासरे, गावकरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news