जालन्यातील साडेपंधरा लाखांच्या स्टिलची मध्यप्रदेशात परस्पर विक्री

जालन्यातील साडेपंधरा लाखांच्या स्टिलची मध्यप्रदेशात परस्पर विक्री
jalna news
जालन्यातील साडेपंधरा लाखांच्या स्टिलची मध्यप्रदेशात परस्पर विक्रीpudhari photo
Published on
Updated on

जालना, पुढारी वृत्तसेवा : येथील भाग्यलक्ष्मी स्टील या कारखान्यातून मध्यप्रदेशात नेण्यासाठी १९.८८० टन लोखंडी सळई ट्रकमधून पाठविण्यात आली होती. मात्र ट्रक चालक व मालकांनी सदर सळईची परस्पर विक्री केली होती. या प्रकरणी स्थानिक गुन्हा शाखा व चंदनझिरा पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत सदर माल मध्यप्रदेशातून हस्तगत करण्यात यश मिळवले.

येथील औद्योगिक वसाहतीतील भाग्यलक्ष्मी स्टील कंपनीतून २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आर जे ०९- जीसी-१९०० या ट्रकमधून मध्यप्रदे शात पाठविण्यासाठी १५ लाख ६१ हजार ३१९ रुपयांचा १९.८८० टन सळईचा माल पाठविण्यात आला होता. सदर ट्रकचा चालक शौकत हुसेन एजाज हुसेन (रा.उज्जैन मध्यप्रदेश) व ट्रक मालक इरफान खान या दोघांनी संगनमत करून लोखंडी सळईची परस्पर विक्री करून मोबाईल बंद केला. या प्रकरणी चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

स्थानिक गुन्हा शाखा व चंदनझिरा पोलिसांनी २९ सप्टेबर रोजी सदरचा माल मध्यप्रदेश राज्यातील शाहजापूर जिल्ह्यातील मोहनबडोदीया पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोयल एजन्सीमधे भाग्य लक्ष्मी स्टील कंपनीतून पाठविण्यात आलेली १५ लाख ६१ हजार ३१९ रुपयांची १९.८८० टन लोखंडी सळई जप्त केली.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पंकज जाधव, पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत, पोलिस अंमलदार सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मनसुब वेताळ, फुलचंद गव्हाणे, लक्ष्मीकांत आडेप, सुधीर वाघमारे, देविदास भोजने, रवी देशुमख यांच्यासह चंदनझिरा पोलिसांनी केली. या कारवाईचे कौतुक होत आहे.

jalna news
पंचवीस लाखांच्या बांधकाम साहित्याची जुन्नरला परस्पर विक्री

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news