Jalna Crime : सराईत फरार गुन्हेगारास गुजरातमधून केले जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेच्या धाडसी मोहिमेला यश
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

जालना : एमपीडीए व एमओसीसीए अंतर्गत कारवाई झालेला आणि विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेला कुख्यात गुन्हेगार पप्पू कचरू घोरपडे ( रा. खडगाव, ता. जि. जालना) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुजरात राज्यातील वलसाड जिल्ह्यातील वापी येथून अटक केली . ही कारवाई पोलिस अधीक्षक तेजस्वी सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांच्या पथकाने केली.

पप्पू घोरपडे हा पोलिसांच्या कारवाईपासून बचाव करण्यासाठी अस्तित्व लपवून फिरत होता. त्यामुळे त्याचा शोध घेण्यात अडचणी निर्माण होत होत्या. मात्र गुप्त बातमीदारांकडून मिळालेली माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तो गुजरातमधील वापी येथे असल्याची खात्री झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तेथे रवाना झाले. १९ जून रोजी त्याला ताब्यात घेऊन जालना येथे आणण्यात आले आणि पुढील कारवाईसाठी 20 जून रोजी बदनापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

Crime News
Nashikroad Jail Forged | जेलमध्ये जिवे मारण्याचा प्रयत्न, अधिकाऱ्यांच्या बदनामीचा कट

पप्पू घोरपडे याच्याविरोधात तालुका जालना पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या दरोड्याच्या गंभीर गुन्ह्यात एमओसीसी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणात तो फरार होता. तसेच २०२५ मध्ये तो सराईत गुन्हेगार म्हणून ओळखला जात असल्याने सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी त्याच्याविरोधातएमपीडीए कायद्यांतर्गत देखील कारवाई करण्यात आली होती. या कारवाईपासून वाचण्यासाठी तो सतत ठिकाणे बदलत होता.

याशिवाय १३ जून २०२६ रोजी दावलवाडी येथे एका जेसीबी ऑपरेटरला बंदुकीचा धाक दाखवून त्याच्याकडील २६ हजार रुपये रोख रक्कम हिसकावून नेल्याच्या जबरी चोरीच्या गुन्ह्यातही त्याचा सहभाग समोर आला आहे. या प्रकरणी बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून या गुन्ह्यातही त्याला अटक करण्यात आली आहे.

Crime News
Sangli illegal liquor crackdown: सांगलीत जेसीबीने गावठी हातभट्टी उद्ध्वस्त

कुख्यात आणि फरार आरोपीला गुजरातमधून शोधून काढत जेरबंद करण्यात आल्‍याने जालना पोलिसांचे हे मोठे यश समजले जात आहे., या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी विरोधातील पोलिसांच्या मोहिमेला बळ मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

logo
Pudhari News
pudhari.news