वडीगोद्री पुढारी वृत्तसेवा : परभणीचे ऊबाटा गटाचे खासदार संजय जाधव यांनी रविवारी (दि.21) अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. जरांगे-पाटील मागील पाच दिवसापासून उपोषणाला बसले आहेत, त्यांची जी मागणी आहे, ती वैयक्तिक नसून सर्व समाजाची मागणी आहे. तसेच सर्व समाज या मागणीची पूर्तता व्हावी. या प्रतीक्षेत आहे सर्व लोकांनी जी भूमिका घेतली आहे. त्यांच्या भूमिकेशी सर्वजण सहमत आहोत. मी इथे जरांगे पाटील यांना भेटायला पक्ष म्हणून नाही, तर समाज म्हणून आलो आहे. अशा प्रकारचे उद्गार त्यांनी काढले.
सरकारने लवकरात लवकर तीनही गॅझेटची नोंद घ्यावी अशी जारांगे पाटील यांची मागणी आहे. ही मागणी आम्ही दिल्लीच्या संसदेमध्ये मांडली आहे. राज्य सरकारने तीनही गॅझेट जाहीर करावे. आम्ही सत्ताधारी पक्षात असतो तर मला सरकारवर दबाव आणता आला असता, पण मी विरोधी पक्षाचा खासदार आहे. आम्ही जरांगे पाटील यांच्यासोबत आहोत, आम्ही आमच्या पक्षालाही सांगितलं आहे मनोज जरांगे पाटील यांचा विषय महत्त्वाचा आहे आणि जिव्हाळ्याचा आहे.त्यामुळे आपली ही भूमिका त्यांच्याशी सहमत असावी अशी मागणी आम्ही पक्षाकडे दिली आहे.