वडीगोद्री : Maharashtra Assembly polls 2024 | विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या वतीने उमेदवार उभे करावेत की पाडावेत? याविषयी शनिवारच्या बैठकीत चर्चा झाली. मात्र, आज रविवारी होणारी बैठक निर्णायक असेल. त्यामध्ये अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी शनिवारी दिली.
अंतरवाली सराटी येथे तज्ज्ञ, वकील, राजकीय अभ्यासक आदींची बैठक शनिवारी झाली. त्यानंतर जरांगे म्हणाले, विधानसभा निवडणूक लढविण्याविषयी या बैठकीत चर्चा झाली. मात्र, कोणताही निर्णय झाला नाही. आज रविवारच्या बैठकीत निवडणूक लढविण्याचा निर्णय झाला तर फॉर्म भरायचे आहेत; अन्यथा उमेदवार पाडायचे ठरणार आहे.
स्वबळावर लढणार की युती करणार, यावर ते म्हणाले की, ते सगळं आज रविवारी ठरेल. कुणाच्या सोबत जाणार नाही. ठरलं तर अपक्ष दणका हाणून द्यायचा, असे जरांगे म्हणाले.