Maratha Reservation | उपोषण सुटलं नाही तरीही ॲम्ब्युलन्सने दौऱ्याला जाणार- मनोज जरांगे

मनोज जरांगे यांचे अंतरवाली सराटीत उपोषण सुरु
Maratha Reservation
जरांगे पाटील यांचे आजपासून उपोषणPudhari
Published on
Updated on

वडीगोद्री

मराठा आरक्षणासाठी सरकारने धोका दिल्याने आज बेमुदत उपोषण सुरू करण्याची वेळ आली आहे. शरीर किती दिवस साथ देईल माहीत नाही. समाज मला आमरण उपोषणाला विरोध करतो, तरीही त्यांच्यासाठी आमरण उपोषण करत आहे. मी जगलो तर पुढच्या दौऱ्यावर जाणार. मेलो तर पुढचे दौरे रद्द होतील. मी जगलो आणि उपोषण सुटलं नाही तरीही ॲम्ब्युलन्सने दौऱ्याला येणार. जिथे जिथे दौरे होणार तिथे ताकदीने तयारी करा. राज्यात कुठेही आंदोलन करून मराठा समाजाने शक्ती दाखवू नये, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले. ते अंतरवाली सराटी उपोषणाला बसले आहेत. आज उपोषणाचा त्यांचा पहिला दिवस असून ते पत्रकारांशी संवाद साधत होते.

Maratha Reservation
Maratha Reservation Manoj Jarange |सरकारला हवा तेवढा वेळ दिला म्हणत मनोज जरांगेंचे आजपासून पुन्हा उपोषण सुरु

मराठा कुणबी एकच..

सगळ्या केसेस मागे घ्या, हैद्राबाद सातारा गॅझेट लागू करा, व्हॅलीडिटी दिली जात नाही, तिन्हीही गॅझेट लागू करा. हैद्राबादहून आणलेले पुरावे लगेच लागू करा, मराठा समाजाला ओबीसीत सरसकट आरक्षण द्या. आरक्षणाच्या बाबतीत आम्ही ठाम आहोत. मराठा कुणबी एकच आहेत. मराठा कुणबी एकच असल्याचा जीआर सुशीलकुमार शिंदे यांनी काढला होता.सगे सोयरे आमची मागणी कायम आहे.

कुणबी नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र द्या ...

मागेल त्या मराठ्याला सापडलेल्या कुणबी नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र द्या. नाही तर आमरण उपोषण कठोर होणार.

हिंगोलीतील पोलीस भरतीसाठी गेलेल्या तरुणाचं जरांगे यांनी जात प्रमाणपत्र दाखवलं. तरुणाकडे जात प्रमाणपत्र असूनही पोलीस त्याला म्हणतायत तो ओपनमध्ये जा, तसं लेखी त्या तरुणाकडून पोलिसांनी लिहून घेतलं आहे. ओपन कॅटॅगिरीतून भरतीसाठी अर्ज भर, असं पोलिसांनी त्याला सांगितलं आहे. त्याची सही देखील घेतल्याचा जरांगे यांचा आरोप आहे. जातीयवादी पोलीस हे करताहेत. इतरांना बोगस कागदपत्रांवर सरकार आयएएस करतंय, आमच्या नोंदी ओरिजिनल असूनही सरकारला चालत नाही, असा टोला मनोज जरांगे यांनी पूजा खेडकर प्रकरणावर सरकारला लगावला.

नोकर भरती, ॲडमिशन यात मराठा मुलांना अडचणी येत आहे. कुणबी प्रमाणपत्र असूनही ओपनमध्ये ढकलल्या जात आहेत. नोकर भरतीत जात प्रमाणपत्र घेतलं जातं नाही. मराठा मुलांना यांनी एकेक वर्ष बदबाद करायचं ठरवलं आहे. नोकर भरतीत जात प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी ६ महिन्याची मुदत द्या. भरतीसाठी कुणबी प्रमाणपत्र असूनही ते घेतलं जातं नाही. ईडब्लूएस, एसईबीसी, कुणबी असे तिन्हीही पर्याय मराठा मुलांना भरतीसाठी सुरू ठेवा. तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असे सांगितले.

काय म्हणताहेत मनोज जरांगे?

सारथीच्या मुलांना काय अडचणी आहेत. जरा त्यांना विचारुन बघा. दादा तुम्ही म्हणता मुलींना शिक्षण मोफत केलं. या अंतरवालीत बघा कुठं सुरुय. मोफत शिक्षण बघा जरा, असे आवाहन त्यांनी चंद्रकांत दादा पाटील यांना दिले. मराठा धनगरांना येड्यात काढायचं आणि आरक्षण द्यायचं नाही असं तुम्हाला करायचं आहे का? लाडकी बहीण त्यासाठी आणलीय का, लाडका भाऊ त्यासाठी आणलं आहे का? आता लाडकी मेहुणी देखील येईल. सरकारने हा डाव टाकला आहे. निवडणूक झाली की हे सगळं बंद पडेल. लोकांना नादेला लावून तुम्ही आरक्षणापासून दूर हटवू शकत नाही. सत्ताधारी लोक चालू यांना नवीन योजना जाहीर करून लोक फक्त चालवायचे आहेत. लाडका भाऊ लाडकी बहीण या योजना द्वारे सरकार फक्त योजनेच्या नावाखाली लोक नादाला लावले आणि योजनेच्या अंमलबजावणीचा पत्ता नाही. म्हाडा, समृद्धी, शक्ती मार्गात हेच पाहायला मिळालं. लाडक्या बहिणीचे दिड हजार घेऊन काहीही होणार नाही. आमचं म्हणणं आहे हे देऊ नका आरक्षण. मी माझ्या समाजाच्या वेदना मांडत आहे.

फडणवीस यांनी चुटकी वाजवून केसेस मागे घेण्याचं आश्वासन दिलं. पण ११ महिने उलटुनही कोणतही आश्वासन पाळल नाही. आमच्या नोंदी रद्द करा असं भुजबळ म्हणतायेत, नोंदी सगळ्याच भागातील रद्द करून तुम्ही तुमचं चांगलं करून घेणार का? जर सर्व समीकरणं जुळले तर निवडणूक लढवता येईल. सर्वांनी एकमेकांच्या जातींना निवडून आणायचं आहे. जर मराठा समाजाचं ठरलं तर मराठ्यांचे एकही मतदान वाया जाऊ द्यायचे नाही.

ठरलेलं आरक्षण द्या नाही तर ..जरांगे पाटील

एका जातीच्या मतांच्या आधारावर कुणीही निवडणूक येऊ शकत नाही त्यासाठी जातीचे समीकरणं जुळवावे लागतात. यांना आरक्षणाच्या मागणीबाबत काहीही देणं घेणं नाही. जर आमचं समीकरण जुळले नाही तर मग जो मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करेल, त्याच कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला प्राधान्य देणार. ठरलेलं आरक्षण द्या आम्हाला राजकारणात जायचं नाही. पण ठरलेलं तुम्ही दिलं नाही तर प्रत्येक मतदार संघात मराठ्यांचे ५० हजार मतदान आहे हे मतदान तुम्हाला पाडण्यासाठी खूप झालं.

आपण जर निवडणूक लढवू म्हटलं तर युती वाले खुश होतायत, निवडणूक लढवली नाही तर महाविकास आघाडीवाले खुश होतात. शेती कामे उरकून घ्या. अंतरवालीत येऊ नका. मी ६ कोटी मराठ्यांच्या वतीने लढत राहणार. समाजाने काळजी करू नये.
मनोज जरांगे पाटील

ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले आम्हीही तेच म्हणत होतो. ज्यांना वाटतं गरीब मोठे झाले पाहिजे त्यांनी एकत्र राहावं, त्यांनीच सांगायचं गरीब मोठे झाले पाहिजे. चालू द्या त्यांचं लोकांच्या लक्षात येतं. वंचितांना न्याय देणारे ते नेते आहेत. यात्रा कुणीही करू शकतो आमची काही नाराजी नाही त्यांनी वंचितांचाच्या बाजूने असायला हवं. आजही प्रकाश आंबेडकर आमच्या सोबत आहेत, ते पुन्हा आमच्या सोबत येतील. मराठयांना एक आणि दुसऱ्यांना एक न्याय नको. प्रकाश आंबेडकर गोरगरिबांचे खमके लिडर आहेत. पूजा खेडकर मॅटर-upsc मध्ये असं होतं तर कठीण आह. सध्या मी यावर बोलत नाही. ते पुन्हा म्हणतील मराठे जातीयवादी आहेत. बरचं बोगस अजून असू शकतं हे आंदोलन झाल्यावर बघू.

या तारखेपर्यंत मनोज जरांगे यांचा दौरा

१३ तारखेपर्यंत मी दौऱ्यावर असेल. पण, १३ ते २० ऑगस्ट दरम्यान मी बैठका घेणार आहे. राज्यातील मराठा बांधवांनी आपापल्या भागाचा डेटा तयार ठेवावा. निवडणुकीची तयारी करावी. सगळ्या समाजाचा डेटा तयार ठेवावा. इच्छुकांनी सुद्धा बैठकीला यावे. २८८ मतदार संघात तयारी करा.

आपल्याला सर्व जातींची मोट बांधायचीय-मनोज जरांगे

'२० ते २७ ऑगस्ट दरम्यान राज्यातील सर्व इच्छुकांनी यावे. आपल्याला सर्व जातींची मोट बांधायची आहे. २० ते २७ ऑगस्ट दरम्यान सर्व समाजला आमचं निमंत्रण आहे, त्यांनी चर्चेला यावे, त्यांच्याशी देखील चर्चा करू. २९ ऑगस्टला संपूर्ण राज्याची मराठ्यांची बैठक घेऊन विधानसभा निवडणूक लढवायची की नाही हे ठरवणार, या दिवशी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होणार आहे. पुढे मी काय करीन, हे आत्ताच जाहीर करणार नाही. २९ ऑगस्टला कसा डाव टाकतो मी बघा.'

शिंदे समिती-नोंदी शोधणं, सापडणं बंद आहे. मनुष्यबळ वाढवा, मोडी लिपीवाल्यांना सरकारने पेमेंट केलेलं नाही. त्यांचा पगार द्या.

Maratha Reservation
Uddhav Thackeray | धारावी अदानींच्या घशात जाऊ देणार नाही : उद्धव ठाकरे

तहसीलदार शेळके यांनी घेतली जरांगेची भेट

मनोज जरांगे पाटील यांची अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आज अंतरवाली सराटी येथे जाऊन भेट घेतली. तसेच जिल्हाधिकारी यांचं पत्र देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. यावेळी जरांगे यांनी पत्र स्वीकारलं खरं मात्र जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या पूर्ण करत नाही., तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असे सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news