

Manoj Jarange's criticism of Bhujbal
वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा: बीडमध्ये झालेला मेळावा हा ओबीसींचा नव्हता, तर तो एका विशिष्ट जातीचा आणि टोळीचा मोर्चा होता हे सिद्ध झाले आहे. त्यांच्या काही गोष्टी बाहेर पडत आहेत, आपण ओबीसी ओबीसी बोंबलायचं आणि मराठा ओबीसींमध्ये तणाव निर्माण करायचा. त्यातून मंत्रिपद साधायचं, असे भुजबळांनीच सांगितलं आहे. घुरर्ट छगन भुजबळ यांचे चक्रव्यूह प्रचंड घातक आणि विषारी आहे, असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी सरपंचाच्या मळ्यात डोळ्याला चष्मा लावून घोडेस्वारीचा आनंद लुटला, हसत-हसत म्हणाले, चष्मा घालताना त्यांनी आपलाच आहे का? असा टोला त्यांनी अप्रत्यक्षपणे मंत्री धनंजय मुंडेंना लगावला. छगन भुजबळांच्या षडयंत्रामध्ये एकदा गुंतलं की बाहेर निघता येत नाही, गोरगरीब मराठा लेकरांचं वाटुळं का करावे? असे पंकजा मुंडे यांना वाटले असावे. यापुढे सुधारणा करू असं त्यांना वाटले असेल.
त्यामुळे पकंजा मुंडे या मेळाव्याला आल्या नसतील असे ही जरांगे पाटील म्हणाले. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील माझ्या मतदारसंघात आले तरी मी निवडून आलो असा दावा शुक्रवारच्या सभेत छगन भुजबळ यांनी केला होता, त्याला देखील जरांगे पाटील यांनी उत्तर दिलं आहे. मी जर खरच आलो असतो, तर भुजबळ यांच्या धुरा उलाल झाल्या असत्या, आता ते निवडून आल्यावर बोलत आहेत, पण तेव्हा तर ते मला मित्र आहे म्हणाले होते. तेव्हा म्हणाले जरांगे पाटील मित्र आहेत, आले आणि गेले. पण त्यावेळी मी एका सांत्वन भेटीला गेलो होतो. छगन भुजबळ यांची काही दिवसांत वाईट अवस्था होणार आहे, तुटलेल्या चपला, केसांवर फुगे असं काही त्यांच्याकडे दिसेल, असंही यावेळी मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा भगवा गमछा अन् गॉगल लावून घोडेस्वारी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव अंतरवाली येथे सरपंचाच्या मळ्यात गळ्यात गमछा आणि डोळ्याला गॉगल लावून घोडेस्वारीचा आनंद घेतला. या घोडेस्वारीचा फेरफटका मारताना त्यांनी एका महत्त्वाच्या घोषणेची माहिती दिली. जरांगे पाटील यांनी सांगितले की, मराठा समाजाच्या अधिवेशनासाठी सुमारे ७० ते ८० लाख मराठे दिल्लीला जाणार आहेत. सध्या मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरून संघर्ष पेटलेला असताना नेत्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. अशा परिस्थितीत जरांगे पाटलांचे हे घोडेस्वारीचे वेगळे रूप पहायला मिळाले. कार्यकत्यांनी "दिल्लीला जायचंय का?" असा प्रश्न विचारला असता, जरांगे पाटलांनी "आता दिल्ली" असे उत्तर दिले. ही दिल्लीवारी कोणत्याही विशिष्ट मागणीसाठी नसून, मराठा अधिवेशनासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशातील विविध भागांतून मराठा समाजबांधव या अधिवेशनासाठी किती संख्येने दिल्लीला पोहोचतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.