

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : विधानसभा निवडणुकीत समाजास बंधनमुक्त ठेवले, आता आरक्षणाच्या लढाईत लढून मरणार असे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले, नवीन सरकार सतेवर आल्यानंतर अंतरवालीत होणार्या सामुदायिक उपोषणाची तारीख जाहीर केली जाणार असल्याचे ते म्हणाले.
या विधानसभा निवडणुकीबाबत समाजाला संकेत दिले आहे. ते त्यांना कळाले आहेत. त्यामुळे संभ्रम ठेऊ नका. लोकसभेला पाडा म्हणलो होतो, आताही पाडा म्हणलो आहे. हे गोरगरिबांना कळले आहे. आता काही संभ्रम नाही, मराठ्यांनी बिनधास्त चालावे. मराठा समाजाने शंभर टक्के मतदान एकजुटीने करुन आपल्या आरक्षणाला विरोध करणारा या निवडणुकीत गेलाच पाहिजे, असे ते म्हणाले, मी काही माझा समाज कोणाच्या दावणीला बांधला नाही. समाज विकलाही नाही. मी समाजाचा सन्मान केला आहे, असे ते म्हणाले.
आम्ही अंतरवाली सराटी येथे सामूहिक उपोषणची तयारी करत असून सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर केली जाईल. भारतातील हे सर्वात मोठे उपोषण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जरांगे यांनी रावसाहेब दानवे आणि बबनराव लोणीकर यांच्यावर टीका केली. या लोकांना जातीचा स्वाभिमान नाही. त्यांच्या वागणुकीमुळे मराठा समाज अडचणीत येत आहे. ते आपल्या रक्ताचे असून या पद्धतीची भाषा वापरत असतील तर समाजाने त्यांना दूर ठेवले पाहिजे.
या लोकांना १०० टक्के पडा शिकवला पाहिजे, त्याशिवाय हे ठिकाणावर येणार नाही. या लोकांना रस्त्यावर आणण्याची ताकद मराठा समाजामध्ये असल्याचे जरांगे म्हणाले. आष्टी येथील सभेत बोलताना काल बबनराव लोणीकर यांनी मराठा समाजाची कांड्याबर मोज ण्या इतकी मते असल्याचे वादग्रस्त विधान केले होते. त्यावरून बराच गदारोळ उडाला. लोणीकर यांनी व्हिडिओ छेडछाड करून प्रसारित कर ण्यात आल्याचा दावा केला आहे.