

Leave Pawar, Thackeray, and the Congress aside; tell us what you have done
वडीगोद्री (जि. जालना), पुढारी वृत्तसेवा : भाजपकडून सातत्याने शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसने मराठा समाजासाठी काय केले, असा प्रश्न विचारला जातो. पण तुम्ही सत्तेत असून मराठ्यांसाठी काय दिवे लावले, असा सवाल मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला.
सरकार जाणूनबुजून मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असून १२ सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटी येथे राज्यस्तरीय बैठक घेऊन मुंबई आंदोलनाची तारीख निश्चित केली जाईल, या बैठकीला राज्यातील मराठा समाजाने मोठ्या प्रमाणात यावे, असे आवाहन त्यांनी केले.
जरांगे यांनी उपोषणाच्या दहाव्या दिवशी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. मुंबईत आंदोलनाच्या वेळी एका जरी तरुणाचे रक्त निघाले तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद झाला पाहिजे, असे ते म्हणाले. २९ ऑगस्टला उपोषणाची वेळ येऊ देणार नाही. आमदार प्रसाद लाड यांनी देवेंद्र फडणवीस आरक्षणावर १०० टक्के मार्ग काढतील, असे सांगितले होते.
मात्र, प्रत्यक्षात तसे झाले नाही, मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, यासाठी सरकारकडून जाणीवपूर्वक हलगर्जीपणा केला जात आहे. हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर मराठवाड्यातील एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला सांगितले होते, असा फडणवीसांना बदनाम करण्याचा शिंदे सेनेचा डाव शिंदें गटाचे दोन मंत्री आणि दोन प्रवक्ते आंदोलन मोडीत काढीत असल्याची माहिती आम्हाला मिळाली.
मुंबईकडे निघाल्यावर पोलिसांकडून हल्ला करून फडणवीस यांना बदनाम करण्याचा शिंदे यांच्या मंत्र्यांचा डाव आहे. बावनकुळे व त्यांच्याही दोन निकटवर्तीयांचे असेच प्रयत्न सुरू आहेत. तीन वर्षांत सरकारने काही केले नाही, तर आता पाच दिवसांत काय होणार? मुंबई आंदोलनाची तयारी आजपासूनच सुरू करण्याचे आवाहन केले. यंदाचे मुंबईतील आंदोलन मागील आंदोलनापेक्षा मोठे असेल आणि तीन कोटींपेक्षा अधिक मराठे आंदोलनात सहभागी होतील, असा दावाही त्यांनी केला.
दावा त्यांनी केला. मग प्रमाणपत्रे रद्द का केली आणि गॅझेटची अंमलबजावणी का झाली नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मुंबई आंदोलनादरम्यान शांततेचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहनही जरांगे यांनी केले. मुंबईला जाताना जाळपोळ, दगडफेक करू नका. पोलिसांनी फडणवीस यांचं ऐकून काही केले तर पोरांनी पळू नये. चेंगराचेंगरी होईल, दबा धरून बसा, बंदूक काही करत नाही, असे ते म्हणाले. आंदोलन शांततेत होईल, मात्र सरकारनेच कायदा हातात घेतला तर आपल्यासमोर नाईलाज निर्माण होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
फडणवीसांना बदनाम करण्याचा शिंदे सेनेचा डाव
शिंदें गटाचे दोन मंत्री आणि दोन प्रवक्ते आंदोलन मोडीत काढीत असल्याची माहिती आम्हाला मिळाली. मुंबईकडे निघाल्यावर पोलिसांकडून हल्ला करून फडणवीस यांना बदनाम करण्याचा शिंदे यांच्या मंत्र्यांचा डाव आहे. बावनकुळे व त्यांच्याही दोन निकटवर्तीयांचे असेच प्रयत्न सुरू आहेत. तीन वर्षांत सरकारने काही केले नाही, तर आता पाच दिवसांत काय होणार? मुंबई आंदोलनाची तयारी आजपासूनच सुरू करण्याचे आवाहन केले. यंदाचे मुंबईतील आंदोलन मागील आंदोलनापेक्षा मोठे असेल आणि तीन कोटींपेक्षा अधिक मराठे आंदोलनात सहभागी होतील, असा दावाही त्यांनी केला.