

Lack of labor to cut chillies, fear among farmers due to free movement of leopard
पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई ही मुख्य हिरवी मिरचीसाठी मुख्य बाजारपेठ असल्याने परिसरातील २० ते २५ गावातील शेतकरी मिरची लागवड करीत असतात. सध्या मिरची तोडणीला सुरूवात झालेली आहे. परंतू शेतात बिबट्या असल्याने मिरची तोडण्यासाठी मजूर जात नसल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे.
यावर्षी मिरचीला सुरुवातीपासून आठ ते दहा हजार रुपये भाव असल्यामुळे शेतकऱ्यांना बऱ्यापैकी फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या मात्र चार ते पाच हजार रुपये मिरची भाव मिळत आहे. या मिरची खरेदी विक्रीसाठी स्थानिक व्यापाऱ्यासह परराज्यातील व्यापारी ठाण मांडून खरेदी विक्रीसाठी बसलेले आहे. परिणामी परिसरातील मजुरांना याचा चांगला फायदा होत आहे.
शेतकऱ्यांनाही उत्पन्नात आर्थिक बाबीत चांगला फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. परंतु मे महिन्यापासूनच शेतात बिबट्याचा शेतकऱ्यांना मुक्त संचार करत असल्याचे दिसले होते. त्याने आतापर्यंत कुठल्याही प्रकारचे हिंसक असे कृती केले नसल्यामुळे कुणीही त्या संदर्भात जास्त वन विभागाकडे पाठपुरावा केला नाही. परंतु गेल्या आठ ते पंधरा दिवसापासून सुरुवातीला त्यांनी कुत्र्याच्या शिकारी केल्यामुळे त्यानंतर हरणाची शिकार केली. एक दिवसापुर्वी शेतातील गोठ्यात बांधलेल्या वासराची शिकार केली. यामुळे शेतकरी व शेतमजूर घाबरले आहे. वनविभागाने बिबट्यासाठी लावण्यात आलेला पिंजरा अद्याप पर्यंत खाली असल्याचे दिसून येत आहे.
वनविभाग जरी ठाम असले तरीही अद्याप पर्यंत बिबट्या पकडण्यास कोणी विभागाला अपयश आले आहे. बिबट्या सापडत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा परिणाम शेतातील मकाला खत टाकण्यासाठी कोळपणे, मिरची तोडणे आधी कामाना विलंब होत असल्याचे दिसत आहे. शेतकरी यांचे आर्थिक नुकसान होत आहे.