Sorghum Price : ज्वारीला आला सोन्याचा भाव; उडीद अव्वल दराने विक्री

जालना बाजार समितीत गव्हाची आवक १,१२१ क्विंटल
Sorghum
SorghumPudhari
Published on
Updated on

Jowar fetches a premium price; Urad sells at top rates

जालना, पुढारी वृत्तसेवा : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शुक्रवार (दि. २४) रोजी विविध शेतीमालाची एकूण ३ हजार ६२७क्विंटल आवक झाली. या व्यवहारातून १ कोटी ४० लाख ९१ हजार १४ रुपयांची उलाढाल झाली. ज्वारीला कमाल ५,१०० प्रति क्विंटल तर उडीदाला ९,०९१ प्रति क्विंटलचा सर्वाधिक भाव मिळाला.

Sorghum
Crime News : भातोडीत मद्यधुंद पतीचा राडा; पत्नीला काठीने मारहाण

बाजार समितीत गव्हाची १,१२१ क्विंटल आवक होऊन त्याला किमान २,३००, कमाल २,७२५ आणि सरासरी २,६३० प्रति क्विंटल भाव मिळाला. ज्वारीची १,०९७ क्विंटल आवक झाली असून किमान २,५००, कमाल ५,१०० आणि सरासरी ३,५०० असा भाव राहिला.

बाजरीची ३३१ क्विंटल आवक झाली. तिला किमान २,०००, कमाल २,७०० आणि सरासरी २,५५० भाव मिळाला. मक्याची १९७ क्विंटल आवक झाली असून सरासरी २,३०० प्रति क्विंटल दर मिळाला. तुरीची १३९ क्विंटल आवक झाली. तिला किमान ७,२००, कमाल ८,१०० आणि सरासरी ७,८०० प्रति क्विंटल भाव मिळाला.

Sorghum
Jalna Crime News : घरासाठी १० लाखांच्या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक-मानसिक छळ

हरभऱ्याची ३०७ क्विंटल आवक झाली असून त्याचा सरासरी भाव ₹६,००० प्रति क्विंटल राहिला. उडीदाची २४ क्विंटल आवक होऊन ९,०९१ प्रति क्विंटल दराने व्यवहार झाले. राजम्याची २२ क्विंटल आवक झाली असून त्याला सरासरी ३,५०० भाव मिळाला. राईची ४ क्विंटल आवक झाली असून ८,००० प्रति क्विंटल दर मिळाला.

सोयाबीनला मिळाला ६,१५० रुपये भाव

जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची ३८५ क्विंटल आवक झाली. सोयाबीनला किमान ६,२००, कमाल ७,२५० आणि सरासरी ७,१५० प्रति क्विंटल भाव मिळाल्याने उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे चित्र बाजार समितीत पाहायला मिळाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news