

Journalist's family attacked, atrocity case registered against sand mafia
परतूर, पुढारी वृत्तसेवा : तुझा पत्रकार पती माझ्या वाळूच्या ट्रॅक्टरच्या बातम्या लावतो आहे, असे म्हणून पत्रकारावर गावातील वाळूमाफियांनी कुटुंबावर हल्ला करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी वाळूमाफियाविरुद्ध परतूर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आनंदवाडी येथील पत्रकार पांडुरंग तुळशीराम शेजूळ यांनी परतूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. प्रशांत भगवान कदम रा. आनंदवाडी, आणि पवार पूर्ण नाव माहीत नाही रा. वरफळवाडी, आणखी एक असे तिघे जण तेथे उभे होते. यावेळी कदम याने शेजूळ यांना उद्देशून जातीवाचक शिवीगाळ केली.
घडलेला प्रकार शेजूळ यांनी पत्नीला सांगितला. पत्नीने कदम यास जाब विचारताच प्रशांत व पवार या दोघांनी तुझा पती माझ्या वाळूच्या ट्रॅक्टरच्या बातम्या लावतो आहे. असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करून जाळून जिवे मारून टाकतो असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली. दोघांनी शेजूळ यांना व त्याच्या पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून मुक्कामार दिला व प्रशांत याने माझ्या डावा हात पिरगाळला आहे. या प्रकरणी प्रशांत कदम, पवार, आणि इतर एक असे तिघांविरुद्ध परतूर पोलिस ठाण्यात ८ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.