Jalna Water Shortage : जिल्ह्यावर भीषण पाणी टंचाईचे संकट

१५ प्रकल्प कोरडे, लघु व मध्यम प्रकल्पांत केवळ ८.५ टक्के पाणीसाठा, टँकरवर राहणार भिस्त
Jalna Water Shortage
Jalna Water Shortage pudhari photo
Published on: 
Updated on: 

जालना: जालना जिल्ह्यात यंदा झालेल्या अत्यल्प पावसामुळे जलसाठ्यांची स्थिती गंभीर बनली असून, आगामी काळात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील एकूण ६७ लघु व मध्यम प्रकल्पांपैकी तब्बल १५ प्रकल्प कोरडे पडले आहेत. उर्वरित ५२ प्रकल्पांमध्ये केवळ ८.५ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने जिल्ह्याच्या पाणीप्रश्नाची तीव्रता वाढली आहे. ऑक्टोबर महिन्यातच ही परिस्थिती निर्माण झाल्याने आगामी आठ महिन्यांत पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याची भीती व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने जलसाठ्यांमध्ये अपेक्षित वाढ झाली नाही. परिणामी, लघु व मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच शेतीसाठी पाणी उपलब्ध होण्याबाबत चिंता वाढली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याची मागणी वाढणार असल्याने उपलब्ध साठ्याचे नियोजन करणे प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरणार आहे.

Jalna Water Shortage
Jalna Illegal Sand Mining : दुधना नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणारा हायवा पकडला

जिल्ह्यातील ६७ लघु प्रकल्पांपैकी १४ प्रकल्प पूर्णपणे कोरडे पडले आहेत. सात प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांपर्यंत, पाच प्रकल्पांमध्ये ५० टक्क्यांपर्यंत, एका प्रकल्पात ७५ टक्क्यांपर्यंत, तर दोन प्रकल्पांमध्ये १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. बहुतांश प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा असल्याने आगामी काळात या पाण्याचा वापर जपून करावा लागणार आहे.

जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांपैकी एक प्रकल्प पूर्णपणे कोरडा पडला आहे. दोन प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला असून, दोन प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांपर्यंत, तर उर्वरित दोन प्रकल्पांमध्ये ५० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा आहे. त्यामुळे मध्यम प्रकल्पांची स्थितीही समाधानकारक नसल्याचे स्पष्ट होत आहे.

जिल्ह्यातील जलसाठ्यांची खालावलेली स्थिती लक्षात घेता पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देणे, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आणि संभाव्य टंचाईचा सामना करण्यासाठी आतापासूनच उपाययोजना करणे आवश्यक आहे. अन्यथा आगामी उन्हाळ्यात जालना जिल्ह्यातील अनेक भागांना भिषण पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.

Jalna Water Shortage
Chhatrapati Sambhajinagar Crime : बहिणीला का छेडतो ? म्हणत १० वीच्या विद्यार्थ्याचे अपहरण

शहरासह जिल्ह्यात संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन मोठया संख्येने टँकरचे उत्पादन करण्यात येत आहे. एवढ्या मोठया संख्येने टँकर तयार केले जात असले तरी टँकर व्यावसायिक पाणी आणणार कोठुन हासुध्दा मोठा प्रश्न आहे.आगामी काळात जालनेकरांची भिस्त टँकरच्या पाण्यावर राहणार आहे.

संभाव्य पाणी टंचाईवर उपाययोजना

जालना जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने उपायोजना सुरू केल्या आहेत. तलावातून होणारा अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी तालुकास्तरावर पथके तयार करण्यात आली आहेत. दुसरीकडे पाणी टंचाईचा आढावा घेण्यात येऊन उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याच्या सूचना देण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news