Jalna Water Crisis| उन्हाळ्याआधीच तीव्र टंचाई, जिल्ह्यात ११७ टँकरद्वारे पाणीपुरवठा; वेगाने खालावणारी पाणीपातळी चिंतेचा विषय

प्रशासनाकडून १११ विहिरींचे अधिग्रहण, वेगाने खालावणारी पाणीपातळी चिंतेचा विषय
Jalna Water Crisis| उन्हाळ्याआधीच  तीव्र टंचाई, जिल्ह्यात ११७ टँकरद्वारे पाणीपुरवठा; वेगाने खालावणारी पाणीपातळी चिंतेचा विषय
Published on: 
Updated on: 

जालना - यंदा जालना जिल्ह्यावर अल निनोचे संकट कोसळल्यामुळे पावसाने पाठ फिरवली. परिणामी, जिल्ह्यात यंदा पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईने नोव्हेंबर महिन्यातच उग्र रूप धारण केले आहे. एरवी कडक उन्हाळ्यात पाहायला मिळणारे टँकरांचे चित्र यंदा नोव्हेंबरमध्येच पाहायला मिळत असून, जिल्ह्यातील टँकरची संख्या थेट शंभरी पार पोहोचली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांची तहान भागवण्यासाठी सध्या एकूण ११७ टँकरांचा आधार घ्यावा लागत असून, जलसाठ्यांची पातळी वेगाने खालावल्याने आगामी उन्हाळ्यात जिल्ह्याला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात सुरू असलेल्या एकूण ११७ टँकरमध्ये ११४ खासगी, तर केवळ ३ शासकीय टँकरांचा समावेश आहे. यावरून प्रशासनाला मोठ्या प्रमाणावर खासगी टँकरांचा आधार घ्यावा लागत असल्याचे स्पष्ट होते. पाणीटंचाई एवढ्या लवकर तीव्र झाल्यामुळे प्रशासनाने तातडीने विहिरींचे अधिग्रहण सुरू केले असून, टँकरसाठी आणि टँकरव्यतिरिक्त अशा एकूण १११ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

Jalna Water Crisis| उन्हाळ्याआधीच  तीव्र टंचाई, जिल्ह्यात ११७ टँकरद्वारे पाणीपुरवठा; वेगाने खालावणारी पाणीपातळी चिंतेचा विषय
Jalna Market Committee : जालना बाजार समितीत शेतमालाची उलाढाल तेजीत

यामध्ये टँकरच्या पाण्यासाठी १०१ विहिरी तर इतर १० विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. नोव्हेंबर महिन्यातच टँकरांची संख्या शंभरी पार गेल्यामुळे प्रशासनासह ग्रामस्थांची चिंता मोठी वाढली आहे.

Jalna Water Crisis| उन्हाळ्याआधीच  तीव्र टंचाई, जिल्ह्यात ११७ टँकरद्वारे पाणीपुरवठा; वेगाने खालावणारी पाणीपातळी चिंतेचा विषय
जालना बसस्थानक प्रवाशांच्या गर्दीने फुलले

दिलासादायक बाब म्हणजे भोकरदन, जाफराबाद, परतूर आणि मंठा तालुक्यांत अद्याप एकही टँकर सुरू झालेला नाही. नोव्हेंबरमध्येच चित्र इतके भयावह असेल, तर उन्हाळ्यात पाण्याचे स्रोत पूर्णपणे आटून जालना जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागण्याची चिन्हे आहेत. प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

तालुकानिहाय टँकरची स्थिती

अंबड तालुकाः सर्वाधिक ४१ टँकर सुरू असून, ३२ गावांमधील ८७,३४० नागरिकांची तहान त्यावर भागवली जात आहे.

घनसावंगी तालुकाः ३० टँकर कार्यरत असून, २० गावे व १५ वाड्यांवरील ६१,८८४ लोकसंख्या पाण्याविना टँकरवर अवलंबून आहे.

बदनापूर तालुकाः ३६ टँकर (३ शासकीय, ३३ खाजगी) सुरू असून, २१ गावे व २५ वाड्यांवरील ५३,९९५ नागरिकांना याचा आधार घ्यावा लागत आहे.

जालना तालुकाः येथे ९ टँकर सुरू असून, ६ गावे व १ वाडीवरील १८,३३६ लोकसंख्या टँकरच्या पाल्यावर तहान भागवत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.