

वडीगोद्री (जालना) : मोसंबीला बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने अंबड तालुक्यातील बारसवाडा येथील शेतकरी पांडुरंग पाटील गटकळ यांनी अडीच एकर मोसंबी बागेवर जेसीबी फिरवला आहे.
जालना जिल्हा हा मोसंबी उत्पादक जिल्हा म्हणून संपूर्ण राज्यात व देशभरात प्रसिद्ध आहे. कारण या भागातील व परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात मोसंबी भागांची लागवड करून संपूर्ण देशाला व राज्याला मोसंबी पुरवतात मात्र आता या मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे हाल होत असल्याचे चित्र संपूर्ण जालना जिल्ह्यात पहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून मोसंबीला मार्केटमध्ये दहा ते पाच रुपये प्रति किलो भाव मिळत असल्याने लागवड केलेला खर्च व औषधी फवारणी तसेच खत याचा सुद्धा निघत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. अगोदरच अतिवृष्टीने संपूर्ण फळबाग ही होत्याची नव्हती झाली, मात्र जी वाचली आहे.
मागील चार वर्षांपासून या बागेची आपल्या मुलाबाळाप्रमाणे संगोपन केले. आता मार्केटमध्ये विक्रीसाठी मोसंबी नेली असता तिला कवडीमोड भाव मिळत आहे. लागवड, खत, औषधीचा खर्च निघणे अवघड झाले आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे अवघड झाले आहे. उलट कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. मोसंबी बागेवर जेसीबी फिरवला आहे.
पांडुरंग गटकळ, मोसंबी उत्पादक शेतकरी