

Jalna Some buses leave without stopping at the newly built bus stop in the city.
बदनापुर, पुढारी वृत्तसेवाः शहरातील नव्याने बांधण्यात आलेल्या बसस्थानकावर काही गाड्या न थांबताच सुसाट वेगाने पुढे निघून जातात. त्यामुळे प्रवाशांना काही काळ बसस्थानकावर एसटी बस ची वाट पाहात थांबावे लागत आहे.
नव्याने बांधण्यात आलेल्या बदनापुर बसस्थानकात एकच वाहतूक नियंत्रक असल्याने या बसस्थानकाची वेळ सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत झाली आहे. वाहतुक नियंत्रक निघुत जात असल्याने संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच या बस स्थानकात बसेस येतात. त्यानंतर बस स्थानकात बसेस न जाता त्या बसस्थानकात न येतात सुसाट वेगाने पुढे निघून जातात. त्यामुळे प्रवाशांना संध्याकाळच्या वेळी बसस्थानकात ताटकळत उभे राहावे लागते.
बदनापूर शहरातून दररोज हजारो प्रवाशी जालना छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जातात व येतात. बदनापुर येथील व्यापारीही वाहेर गावाहुन अप-डाऊन करतात. त्यांना सुध्दा बसस्थानकात बस ची वाट पाहत थांबावे लागते. नवीन बसस्थानक हे शहराच्या बाहेर असल्याने प्रवाशांमधे असुरक्षीतेतीची भावना आहे.
संध्याकाळी प्रवाश्यासाठी जुन्या बसस्थानकामध्ये देखील उतरण्याची आणि बसण्यासाठी बस थांबविण्यात येण्याची मागणी होत आहे. सदर प्रतिनिधींनी आगार व्यवस्थापक जैवाळ यांच्याशी वेळो-वेळी फोन केला असता त्यांनी बदनापुर बसस्थानकात आणखी एका वाहतुक नियंत्रक अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येणार असल्याचे सांगीतले.