

अंबड : सोलापूर-धुळे महामार्गावरील अंबड तालुक्यातील महाकाळा पाटी येथे उभ्या असलेल्या ट्रकला कारची (MH-20-CS-6041 Hyundai i10) धडक होवून अपघात झाला असून सदर अपघातामध्ये ४ व्यक्तींचा जागीच मृत्यु झाला असून २ जन गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघातात अनिता परसराम कुटे, वय ४८ वर्ष ह्या संभाजीनगर येथील रहिवासी असून भागवंत यशवंत चौरे, वय ४७ वर्ष , श्रृष्टी भागवंत चौरे, वय १३ वर्ष , वेधंनंम भागवंत चौरे, वय ११ वर्ष , हे तिघेजण अंबड रोड जालना येथील रहिवासी असून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर कारचालक परसराम लक्ष्मण कुटे, रा.संभाजीनगर व छाया भावंत चौरे, वय ४० वर्ष रा.अंबड रोड जालना ह्या जखमी झाल्या असून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले असून मयत व्यक्तींना शहागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले आहे. अशी माहिती संबंधित महाकाळा सानप तलाठी आणि अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांनी दिली आहे.