Jalna Youth Death | सावकारांच्या कर्जाच्या तगाद्याला कंटाळून तरुणाने जीवन संपविले; चिठ्ठीत लिहून ठेवली चौघांची नावे

वाळकेश्वर शिवारातील घटना; मृताच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत चौघांकडून त्रास आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा उल्लेख
Shahagad Walkeshwar News
विलास मोहनराव शिंदेPudhari
Published on: 
Updated on: 

Shahagad Walkeshwar News

शहागड : खासगी कर्जाच्या वसुलीसाठी होणारा कथित त्रास आणि जीवे मारण्याच्या धमक्यांना कंटाळून एका विवाहित तरुणाने जीवन संपविल्याची घटना अंबड तालुक्यातील वाळकेश्वर शिवारात गुरुवारी ( दि. २९) घडली. विलास मोहनराव शिंदे (रा. नवीन नागझरी, ता. गेवराई, जि. बीड) असे मृत तरुणाचे नाव आहे. घटनास्थळी त्याच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीमुळे या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाळकेश्वर शिवारातील माणिक जैस्वाल यांच्या गट क्रमांक ४४ मधील शेतात बाभळीच्या झाडाला एका तरुणाचा मृतदेह आढळला. गुरुवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास शेतकऱ्यांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यांनी तातडीने शहागड पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

Shahagad Walkeshwar News
Jalna News : ऊसतोड कामगार महिलांच्या आरोग्याची होतेय ‘परवड’ !

माहिती मिळताच सहाय्यक फौजदार फुलचंद हजारे आणि जमादार रामदास केंद्रे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शहागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला. त्यानंतर मृताची ओळख विलास मोहनराव शिंदे अशी पटली.

चिठ्ठीत चौघांची नावे

मृत विलास शिंदे यांच्या खिशात त्यांनी स्वतः लिहिलेली चिठ्ठी आढळून आल्याचे समजते. या चिठ्ठीत उमेश गुंड याला पोपट धनगर, शुभम रोकडे आणि रामनाथ बेदरे यांच्याकडून पैसे घेऊन दिल्याचा उल्लेख आहे. या पैशांवरून संबंधितांकडून पैशांची मागणी करत मानसिक त्रास दिला जात असल्याचे, तसेच जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचे विलास यांनी चिठ्ठीत नमूद केल्याची माहिती आहे. यापूर्वीही अशा प्रकारचा त्रास आणि मारहाण झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.