Jalna News : शहागडमध्ये १८ आकडेबहाद्दरांवर महावितरणची धडक कारवाई

वीज चोरीसाठी वापरलेल्या वायर जप्त
Jalna News
शहागडमध्ये १८ आकडेबहाद्दरांवर महावितरणची धडक कारवाई
Published on
Updated on

शहागड : अंबड तालुक्यातील शहागड आणि परिसरात विद्युत वाहिन्यांवर अनधिकृतरीत्या आकडे टाकून थेट वीज चोरी करणाऱ्यांविरोधात महावितरणच्या पथकाने शनिवारी (दि. ५) सकाळी धडक कारवाई केली. या धडक मोहिमेत तब्बल १८ आकडेबहाद्दरांवर कारवाई करण्यात आली असून वीज चोरीसाठी वापरण्यात आलेले वायरचे जाळे जप्त करण्यात आले आहे.

महावितरणचे कार्यकारी अभियंता विकास अल्हाद आणि अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष शोध मोहीम राबवण्यात आली. शहागड परिसरात अनेक ठिकाणी विजेच्या मुख्य तारांवर आकडे टाकून बेकायदेशीरपणे वीज वापरली जात असल्याची माहिती मिळताच महावितरणच्या पथकाने अचानक छापे टाकले.

सहायक अभियंता नितीन राठोड यांच्या सूचनांनुसार लाईनमन के. पी. काकडे, सलमान शेख, रमेश गोडसे, संदीप कोरटकर, रामेश्वर गिरी, फरहान शेख, विजय चव्हाण, दत्ता गांधले आणि सूर्यकांत घाणे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली. कारवाईदरम्यान वीज चोरीसाठी वापरण्यात आलेल्या वायर जप्त करण्यात आल्या असून सर्व संबंधितांवर नियमांनुसार कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महावितरणच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील वीजचोरांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news