Jalna crime : जालन्यात सहा वर्षीय बालीकेचा विनयभंग

साठ वर्षांच्या वृद्धास पोलिसांनी घेतले ताब्यात
Jalna crime
जालना : शहरातील सदर बाजार पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन करतांना माजी आ.कैलाश गोरंट्याल यांच्यासह इतर. pudhari photo
Published on
Updated on

जालना : जालना शहरातील रामनगर भागात एका सहा वर्षीय बालीकेसोबत साठ वर्षीय वृध्दाने दुष्कृत्य केले. या प्रकरणी सदर बाजार पोलिसांनी साठ वर्षीय इसमाला ताब्यात घेतले आहे.सहा वर्षीय बालीकेला चॉकलेटचे अमीष दाखवुन दुष्कृत्य करण्यात आल्याचा आरोप आहे.

जालना शहरातील रामनगर भागातील एका सहा वर्षीय मुलीवर शनिवारी रात्री साठ वर्षीय वयोवृध्दाने दुष्कृत्य केल्याची माहीती समजल्यानंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली. या प्रकरणी रविवारी सकाळी मोठया संख्येने नागरीकांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात धाव घेतली.

Jalna crime
Jalna road development : टेंभुर्णी-पापळा रस्त्याच्या कामास सुरुवात

यावेळी संशयीत आरोपीस ताब्यात देण्याची मागणी करीत नागरीकांनी सदर बाजार पोलिस ठाण्याच्या समोर ठिय्या आंदोलन केले. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहीती मिळाल्यानंतर माजी आ.कैलाश गोरंट्याल यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात धाव घेतली. सदर बाजार पोलिस ठाण्यात मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन आरोपी विरुध्द गुन्हा दाखल होणार आहे. दरम्‍यान, आरोपीला अटक करण्यात आली असुन त्यास न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली.

Jalna crime
Jalna rainfall : रिमझिम सरींनी आशा जागल्या; दमदार पावसाची आस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news