Jalna Rabi Jowar Seeds Scheme : १०५८५ रब्बी ज्वारी बियाणे मिनीकिट्स होणार वाटप

१० नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करावी
Jalna Rabi Jowar Seeds Scheme
Jalna Rabi Jowar Seeds Schemepudhari photo
Published on: 
Updated on: 

जालना : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना रब्बी हंगामात दिलासा देण्यासाठी शासनामार्फत सुधारित रब्बी ज्वारी बियाणे मिनीकिट्स वितरण योजना राबविण्यात येत आहे. यंदा जालना जिल्ह्यासाठी एकूण १० हजार ५८५ रब्बी ज्वारी बियाणे मिनीकिट्स मंजूर करण्यात आल्या असून, त्यांचे वितरण १० नोव्हेंबर पूर्वी करण्याचे नियोजन आहे.

जिल्ह्यातील कमी पर्जन्यमान आणि दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन ही योजना राबविण्यात येत आहे. प्रत्येक मिनीकिटमध्ये चार किलो वजनाचे ज्वारीचे बियाणे, प्रक्रिया केलेल्या बियाण्याची जैविक खताची पाकिटे तसेच पीक लागवडीविषयक माहितीपत्रक व ई-बाबींचा समावेश असणार आहे.

Jalna Rabi Jowar Seeds Scheme
Jalna School Midday Meal Protest : सेंट्रल किचनमुळे महिला कामगारांच्या रोजगारावर गदा?; जिल्हा परिषदेवर निदर्शने

कमी पाण्यात उत्पादन देणारे आणि प्रतिकूल हवामानात तग धरणारे सुधारित ज्वारीचे वाण शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा व पोषण अभियानांतर्गत पौष्टिक तृणधान्य पिकांना प्रोत्साहन देण्यासाठीही ही योजना महत्त्वाची ठरणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलद्वारे ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर करण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांनी विलंब न करता महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज नोंदणी करावी. निवड झालेल्या पात्र शेतकऱ्यांना १० नोव्हेंबर पूर्वी नियोजनबद्ध पद्धतीने मिनीकिट्सचे वितरण करण्याचे नियोजन आहे.

Jalna Rabi Jowar Seeds Scheme
Sambhajinagar Crime : पाचवीत शिकणाऱ्या चिमुकलीला विवस्त्र करून दिले सिगारेटचे चटके

शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करावा- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी www.mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin या संकेतस्थळाचा वापर करावा. योजनेबाबत अधिक माहितीसाठी www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा संबंधित सहायक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, मंडळ व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

जी. आर. कापसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news