Jalna Motorcycle Theft : दुचाकी चोरी, विधिसंघर्षग्रस्तासह एक जण जेरबंद, दोन दुचाकी जप्त

१ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त
Jalna Motorcycle Theft
जालना : येथील स्थानिक गुन्हा शाखेच्यावतीने दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात पकडण्यात आलेल्या आरोपीसह अधिकारी व कर्मचारी.pudhari photo
Published on: 
Updated on: 

जालना : मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. पोलिसांनी एका विधिसंघर्षग्रस्त बालकासह एका जणास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून १ लाख ४० हजार रुपये किमतीच्या दोन चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांनी विशेष पथक तयार करून तपास सुरू केला. ५ नोव्हेंबर रोजी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजय एकनाथ टेकाळे याच्याकडे चोरीची शाईन मोटारसायकल असल्याचे समोर आले.

Jalna Motorcycle Theft
Jalna Farmer Loan Waiver : जिल्ह्यातील ३९ हजार ३५२ शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमुक्तीची रक्कम जमा

त्यानंतर पोलिसांनी नवीन मोंढा परिसरातील हॉटेल बकासुर, बायपास रोड येथून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याच्याकडील शाईन मोटारसायकल चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी ९० हजार रुपये किमतीची ही मोटारसायकल जप्त केली.

या मोटारसायकल चोरीप्रकरणी जाफराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. अधिक चौकशी केली असता, अजय टेकाळे याने ही दुचाकी एका विधिसंघर्षग्रस्त बालकाकडून खरेदी केल्याचे सांगितले. या पल्सर मोटारसायकल चोरीप्रकरणी भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दोन्ही मोटारसायकली जप्त करून विधिसंघर्षग्रस्त बालक व आरोपी अजय टेकाळे यांना पुढील कारवाईसाठी जाफराबाद पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

Jalna Motorcycle Theft
Sambhajinagar Leopard Rescue Operation : ८ दिवसांत २ बिबटे जेरबंद

ही कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक विक्रम साळी तसेच भोकरदन उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव व त्यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.