Jalna News : जुगार अड्ड्यावर कारवाई; नऊ जण ताब्यात

जुगार अड्ड्यावर चंदनझिरा पोलिसांनी धाड टाकून ४ ऑगस्ट रोजी ९ जणांना ताब्यात घेतले.
Jalna News
Jalna News : जुगार अड्ड्यावर कारवाई; नऊ जण ताब्यातfile photo
Published on
Updated on

Jalna News: Raid on gambling den; nine persons detained

जालना, पुढारी वृत्तसेवा: जालना शहरातील एमआयडीसी परिसरातील न्यू जगदंबा ट्रान्सपोर्टच्या कार्यालयात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर चंदनझिरा पोलिसांनी धाड टाकून ४ ऑगस्ट रोजी ९ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल, मोटारसायकल आणि एका रिक्षासह एकूण ६ लाख ८८ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Jalna News
Jalna ST buses : जालना जिल्ह्याला 'राजमाता जिजाऊ' बसेसची भेट; अंबड-परतूर आगारात ८ नव्या बस दाखल

उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने छापा टाकत जुगार खेळणाऱ्या व्यक्तींना रंगेहाथ पकडले. जुगारासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या चालकासह शिवनाथ विठ्ठल चोरमारे, रा. टट्टूपुरा, गोविंद राधाकिसन शेळके रा. देऊळगाव राजा रोड, किरण जाधव रा. दाभाडी, प्रदीप टेकाळे, रा. यमुना रेसिडेंसी, अंकुश इंगळे रा. गोलापांगरी, शिवा वाल्हेकर, रा. रॉयलनगर, सुनील आदमाने रा. एकता चौक, चंदनझिरा, शे. हफिस शेख गफूर, रा. गांधी नगर, व जुगार चालक संतोष शिकारे, रा. ढवळेश्ववर या सर्व ९ आरोपींविरुद्ध चंदनझिरा पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news