Jalna News : उसाला तीनशे रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देणार

घनसावंगी : समृद्धी कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांची घोषणा
Jalna News
Jalna News : उसाला तीनशे रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देणारfile photo
Published on: 
Updated on: 

Jalna News: Incentive grant of up to 300 rupees to be provided for sugarcane

घनसावंगी/तीर्थपुरी पुढारी वृत्तसेवा : गेल्या चार वर्षांपासून समृद्धी साखर कारखाना मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या उसाला उच्चांकी भाव देत आला आहे. यंदा दुष्काळाचे संकट असले तरी शेतकऱ्यांच्या पाठीशी कारखाना भक्कमपणे उभा राहणार असून यावर्षीच्या उसाला देखील उच्चांकीच भाव देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे पाटील यांनी केली आहे. तसेच यावर्षी गाळप होणाऱ्या उसाला ठरणाऱ्या दराव्यतिरिक्त ३०० रुपयांच्या प्रोत्साहनपर अनुदानाची मोठी घोषणा देखील त्यांनी केली आहे.

Jalna News
Jalna News : जालना रेशीम कोष बाजारपेठेत दराची भरारी !

गुरुवारी (दि. १५) सतीश घाटगे व महेंद्र मेठी यांच्या हस्ते मोळी पूजन करून युनिट नंबर १ व युनिट नंबर २ च्या ऊस गाळपाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. या कार्यक्रमास संचालक दिलीप फलके, संचालिका वैशाली घाटगे, रिंकीताई मेठी, संचालक अभिजित उढाण, रंजित उढाण, जितेंद्र मेठी, विकी शिंदे, मुख्य शेतकरी अधिकारी अमोल तौर, व्यवस्थापक आर.एस. माथनकर, चीफ केमिस्ट सुमितकुमार माथुर उस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

समृद्धीच्या दोन युनिट्समुळे कारखान्याची गाळप क्षमता १२ हजार मेट्रिक टन झाली आहे. त्यामुळे यंदा १०० ते १२० दिवसांत सगळ्या शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप पूर्ण होणार आहे. यावेळी शेतकरी, पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

Jalna News
Navaratri Festival : रांगोळीतून साकारली देवीची प्रतिकृती; आठ तासांचे परिश्रम

दिवाळीत १०० रुपयांचा वाढीव हप्ता

दुष्काळी संकटामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मागील वर्षीच्या उसासाठी दिवाळी सणासाठी १०० रुपये प्रति मे. टनप्रमाणे वाढीव हप्ता देण्यात येणार आहे. हा अंतिम हप्ता नसून दिवाळीनंतर अंतिम हप्ता जाहीर करण्यात येणार असल्याचे सतीश घाटगे यांनी स्पष्ट केले आहे. गाळप हंगाम २०२५-२६ च्या उसाला आतापर्यंत २९०० रुपये प्रति मे. टनप्रमाणे रक्कम देण्यात आली आहे. त्यात १०० रुपयांचा तिसरा वाढीव हप्ता दिवाळीत देण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news