Jalna News : दोन महिने उलटले तरी पूर्णा, खेळणा कोरड्याच

दोन दिवसांपासून रिमझिमची हजेरी; दमदार पावसाची प्रतीक्षा
Jalna News
Jalna News : दोन महिने उलटले तरी पूर्णा, खेळणा कोरड्याचfile photo
Published on
Updated on

Jalna News: Even after two months, the Purna and Khelna rivers remain dry

जाफराबाद, पुढारी वृत्तसेवा : पावसाळा सुरू होऊन जवळपास दोन महिने उलटले असतानाही जाफराबाद तालुक्यातील पूर्णा, खेळणा आणि धामणा या प्रमुख नद्या अद्यापही कोरड्याच असल्याचे चित्र आहे. गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरणासह रिमझिम पावसाला सुरुवात झाली असली, तरी या पावसामुळे नद्यांमध्ये प्रवाह सुरू होईल इतका पाऊस अद्याप झालेला नाही.

Jalna News
Jalna News : नियमांचे उल्लंघन; आष्टी येथील देशी दारू दुकानावर कारवाई

दरवर्षी याच काळात नदीपात्रे पाण्याने भरून वाहताना दिसतात. मात्र यंदा अल्प व विस्कळीत पावसामुळे नदीपात्रात पाण्याऐवजी उघडी जमीन, वाळू आणि गाळाचेच चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यात खरीप पिकांची पेरणी पूर्ण झाली असली तरी दमदार पावसाअभावी पिकांच्या वाढीवर परिणाम होत आहे. नदीकाठच्या विहिरी व इतर जलस्रोतांमध्येही अपेक्षित पाणी साचलेले नाही. परिणामी जाफराबाद तालुक्यात भविष्यात पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचाही प्रश्न गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे.

Jalna News
Jalna News : शाळकरी मुलांसाठी बससेवा तातडीने सुरू करा

पावसाने आशा पल्लवित

गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि रिमझिम पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. मात्र नद्यांना प्रवाह सुरू होण्यासाठी आणि जलसाठ्यात वाढ होण्यासाठी सलग व मुसळधार पावसाची गरज असल्याचे जाणकारांचे मत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news