Jalna News : मंगळ बाजारातील ५२ अतिक्रमणे हटविली

जालना महापालिकेची धडक कारवाई; मंगळ बाजार-भिकारी चौक परिसर अतिक्रमणमुक्त
Jalna News
Jalna News : मंगळ बाजारातील ५२ अतिक्रमणे हटविलीfile photo
Published on
Updated on

Jalna News: 52 encroachments removed from Mangal Bazaar

जालना, पुढारी वृत्तसेवा: शहर महानगरपालिका प्रशासनाने अनधिकृत अतिक्रमणांविरोधातील मोहीम अधिक तीव्र करत बुधवारी (दि. १५) मंगळ बाजार व भिकारी चौक परिसरात मोठी कारवाई केली. या मोहिमेत एकूण ५२ अनधिकृत अतिक्रमणे हटविण्यात आली. महापालिकेच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील रस्ते आणि सार्वजनिक जागा मोकळ्या झाल्या.

Jalna News
Jalna Encroachment Removal Drive : मंठा चौफुली परिसराचा श्वास मोकळा; मनपाची कारवाई

महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा यांच्या निर्देशानुसार ही मोहीम राबविण्यात आली. कारवाईदरम्यान दोन जेसीबी, एक टिप्पर तसेच महापालिकेचा मोठा कर्मचारी वर्ग तैनात करण्यात आला होता. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस प्रशासनाचेही सहकार्य घेण्यात आले.

उपायुक्त त्र्यंबक कांबळे व सहायक आयुक्त विजय फुलंब्रीकर यांच्या उपस्थितीत ही मोहीम पार पडली. यावेळी शोएब खान, शुभम जाधव, राहुल हिवाळे, मॅथ्यू चॉको, फेरोज बेग, कादर खान, तुषार लोखंडे यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्या ठिकाणी अतिक्रमण हटविण्यात आले आहे, त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण आढळल्यास महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यानुसार संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. रस्त्यावर अतिक्रमण करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Jalna News
Waluj MIDC encroachment drive : बजाजनगरात अतिक्रमण हटवताना दुजाभाव
शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी झालेल्या खर्चाची वसुलीही संबंधितांकडून करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. शहरातील प्रमुख मार्ग, चौक आणि सार्वजनिक जागांवरील अनधिकृत अतिक्रमणे हटविण्याची मोहीम पुढील काळातही सातत्याने आणि प्रभावीपणे सुरू ठेवण्यात येणार आहे.
- अंजली शर्मा, आयुक्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news