

Jalna News: 408 nomination forms withdrawn from the municipal corporation elections.
जालना, पुढारी वृत्तसेवाः
महापालिकेच्या निवडणुकीचे राजकीय वातावरण चांगलेच तापायला सुरुवात झाली आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सुमारे 408 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. यामुळे आत निवडणुकीच्या रिंगणात 448 उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.
जालना शहर महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात 856 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. यात सर्वाधिक जास्त इच्छुक उमेदवार हे भारतीय जनता पार्टीकडून होते. महायुती तुटल्यामुळे उमेदवारी अर्जात वाढ झाली आहे. यात भाजपाकडून 64 जागा आणि एक जागा रिपाइं आठवले गटासाठी सोडण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाने 50 जागेवर आले उमेदवार उभे केले आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटानेदेखील आपले उमेदवार उभे केले आहे.
महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसने 40 जागा, शिवसेना उबाठा 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने 13 जागा लढवण्याचा निर्णय केला आह. अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवार (दि. 2) रोजी 408 उमेदवारांनी माघार घेतली आहे. यामुळे सर्वच 16 प्रभागात प्रचाराचा धुरळा उडणार आहे.
महानगर पालिकेच्या 16 प्रभागांत एकूण 65 जागा आहेत. त्यासाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. मंगळवार (दि.30) पर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले. बुधवार (दि. 31) झालेल्या छाननीत विविध कारणांमुळे एकूण 73 उमेदवारी अर्ज बाद झाले आहे. उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी 515 जणांनी माघार घेतल्याने 1500 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामुळे आजपासून प्रमुख उमेदवारांकडून सर्वच 16 प्रभागांत प्रचाराचा धुरळा उडणार आहे. रॅली, पदयात्रा काढून संपूर्ण प्रभाग ढवळून काढला जाणार आहे. त्यामुळे निवडणुकीची खरी रंगत पाहायला मिळणार आहे.
आज चिन्ह वाटप
शुक्रवारी (दि.2) रोजी दुपारी तीनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आलेले आहे. प्रमुख पक्षाच्या उमेदवाराना चिन्ह आहे. अपक्ष उमेदवारांना चिन्ह शनिवारी (दि.3) वाटप करण्यात येणार आहे. याच दिवशी अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.