

जालना : जालना येथील एका नामांकित नॉन-बँकिंग फायनान्स कंपनीच्या कलेक्शन एजन्सीने ग्राहकांकडून 9,82,406 रुपयांची फसवणूक केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी एजन्सीचे मालक मोहम्मद समीर खैराती यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, 26 ऑगस्ट 2025 ते 5 जानेवारी 2026 या कालावधीत मोहम्मद समीर खैराती यांनी कंपनीच्या ग्राहकांकडून थकीत रक्कम वसूल केली. मात्र ती रक्कम 24 तासांच्या आत कंपनीच्या खात्यात जमा करण्याऐवजी स्वतःजवळ ठेवली. याशिवाय काही ग्राहकांच्या वाहनांचा बेकायदेशीर ताबाही घेतल्याचे आरोप आहेत.
सदर बाजार पोलिस ठाण्यात 6 एप्रिल 2026 रोजी दुपारी 13.30 वाजता गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक सचिन वासुदेवराव सानप यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.