Jalna murder | प्रेम संबंधाच्या संशयावरुन तरुणाचा चाकूने वार करुन खून

तिघाजणांचे कृत्‍य : अंबड तालुक्यातील रुई येथील महिन्यातील दुसरी घटना, तीर्थपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Jalna murder
खून झालेला तरुण, घटनास्थळी झालेली गर्दी
Published on
Updated on

सुखापुरी : रुई येथे महिन्याभरापुर्वीच मुलाने बापाचा खून केल्याची केल्याची घटना ताजी असताना आज प्रेमसंबधातून तरुणाच्यास खून झाल्याची दुसरी घटना घडली आहे. अशा वाढत्या घटनेमुळे गावातील नागरिक भयभीत झाली आहे. घटना गुरुवार (ता. 14) साडे चार वाजेच्या दरम्यान घडली.

या बाबत माहिती अशी की रुई ता. अंबड येथील राजेश विष्णु कोरकाने याचे व गावातील शुभम दत्ता साळे व त्याचा भाऊ करण दत्ता साळे याची बहीण पुनम यांचे प्रेमसंबंध असल्याचे कळाल्याने वाद सुरु होता.

मंगळवार (ता. 12) दुपारी 12.00 वा. च्या सुमारास याच कारणावरून भांडण झाले होते त्या ठिकाणी समजुत घालुन सोडवासोडव करण्यात आली. त्याच वेळी तेथे दत्ता शेषराव साळे हेही तेथे आले त्यांनी राजेश याला तुला एक दोन दिवसात पाहुन घेतो अशी धमकी दिली व ते तेथुन निघुन गेले होते. सर्वच गावातील असल्याने घरच्या लोकांनी मनावर घेतले नाही.

गुरुवार (ता. 14) रोजी जिल्हा परीषद शाळेमध्ये कैलास मुळे यांचे मुलीचे लग्न असल्याने सदर लग्न सोहळ्यामध्ये राजेश हा व-हाडी मंडळींना जेवण वाढत होता. तेव्हा अचानक राजेश ला मारण्यासाठी आरोपी तिथे आले . त्‍याने पळण्याचा प्रयत्न केला. मात्र शुभम दत्ता साळे, करण दत्ता साळे, व अभिषेक उर्फ मोन्या अशोक मुसळे यांनी राजेश यांचा पाठलाग करून राजु बांगड यांच्या घराशेजारी असलेल्या पडीत जागेवर राजेश कोरकाने यास गाठून त्यांच्या चेह-यावर, छातीवर, दोन्ही हातावर, गळ्यावर कोणत्यातरी धारधार हत्याराने वार करून करून ठार मारले. या प्रकरणी काशीबाई पंढरीनाथ कोरकाने यांनी तक्रार दिली असून तीर्थपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news