

Jalna Voting Percentage
जालना: शहरातील डबल जीन येथील 09 मधील महानगरपालिका शाळेमध्ये बोगस मतदान करण्यासाठी आलेल्या एकाला ताब्यात घेतले आहे. त्रिंबक कडूबा देठे असे मतदाराचे नावावर मतदान करण्यासाठी हा व्यक्ती आला होता. त्याला वडिलांचे नाव सांगताना आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, जालना महानगरपालिकेसाठी दुपारी 3.30 वाजेपर्यंत 45.94 टक्के मतदान झाले आहे. शहरात महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवार दि. 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.30 वाजेपासून मतदानास उत्साहात सुरुवात झाली आहे. महानगरपालिकेसाठी दुपारी 3.30 वाजेपर्यंत 45.94 टक्के मतदान झाले आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, जालना महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालना पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.